लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना विषाणूपासून बचावासाठी लवकरच लस उपलब्ध होणार असल्यामुळे त्या दृष्टीने जळगाव जिल्ह्यातली प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू करण्यात आले आहे. यात गेल्या आठवड्यात शासनाकडून शाहू महाराज रुग्णालयात ५०० लीटर लस साठवणूक करता येईल, एवढ्या क्षमतेचे दोन मोठे फ्रीज दाखल झाले आहेत.
जिल्ह्यातील १९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राथमिक टप्प्यात लस दिली जाणार आहे. त्यासाठी स्थानिक आरोग्य केंद्रामध्ये साठवणुकीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे तर शहरासाठी ही लस साठवून ठेवण्यासाठी दोन फ्रीज दाखल झाले असून, यातील एक आता पालिकेच्या शाहू महाराज रुग्णालयात आणि नानीबाई रुग्णालयात एक असे हे फ्रीज ठेवण्यात आले आहेत. २ ते ८ डिग्रीपर्यंतच्या तापमानावर ही लस साठवता येणार आहे. आता नेमकी कोणती लस येणार यावर अन्य बाबी अवलंबून राहतील, अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली. दरम्यान, प्रत्येकाला दोन डोस असतील; मात्र हेही लस निश्चित झाल्यावरच होणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण
लस कशी द्यावी, कुठे द्यावी, कशी साठवावी या बाबींचे अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंतचे प्रशिक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे लस येण्याची वाट असल्याचे चित्र आहे.
फोटो आहे...