फोटो : ९.०५ वाजेचा मेल सागर दुबे नावाने (प्रा. एल.आर.चौधरी)
९.०४ वाजेचा मेल सागर दुबे नावाने (प्रा. आर.डी.चौधरी)
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एकच विभाग...विषयसुद्धा एकच....एवढेच नव्हे तर दोघांची घनिष्ट मैत्री.....अशा अगदी जवळच्या मित्रांचा नुकताच एका आठवड्याच्या अंतराने मृत्यू झाला. एल.आर. व आर.डी. या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रा.आर.डी. चौधरी व एल.आर.चौधरी या दोन प्राध्यापकांच्या मृत्यूमुळे मू.जे. महाविद्यालयात व शिक्षण क्षेत्रात दु:ख व्यक्त केले जात आहे.
प्रा. आर.डी. चौधरी व प्रा. एल.आर.चौधरी हे मुळजी जेठा महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात कार्यरत होते. दोघे एकाच विभागात व एकच विषय विद्यार्थ्यांना शिकवीत होते. अभ्यासक्रमाचा अर्धा भाग प्रा. आर.डी.चौधरी, तर अर्धा भाग हे प्रा. एल.आर. चौधरी शिकवायचे. महाविद्यालयापासून दोघांमध्ये घनिष्ट मैत्री...दोघे सोबत क्लासेस घेत असत. त्यात दोघेही आपापल्या विषयात तज्ज्ञ. त्यामुळे अख्ख्या जिल्ह्यात दोघांचे नाव. दुसरीकडे एल.आर. व आर.डी या नावाने दोघेही प्रसिद्ध झाले. महाविद्यालयातून सुरू झालेली मैत्री अखेरपर्यंत टिकवून ठेवली.
अन् घेतला अखेरचा श्वास
प्रा. आर.डी. चौधरी यांचे नुकतेच २७ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यापाठोपाठ त्यांचे मित्र प्रा. एल.आर. चौधरी यांनी सुद्धा शनिवारी अखेरचा श्वास घेतला. आयुष्यभर मैत्री निभावणाऱ्या मित्रांनी आठवडाभराच्या अंतराने अखेरचा श्वास घेतल्यामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रा.आर.डी. चौधरी हे फिजिकल केमिस्ट्री, तर प्रा. एल.आर. चौधरी हे ऑरगॅनिक केमिस्ट्री विषय शिकवीत होते.