लोकमत न्यूज नेटवर्क
एरंडोल : अंजनी धरण फुल्ल झाल्याने आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले आणि तीनपैकी दोन दरवाजे उघडण्यात आले. यातून १९० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
अंजनी धरणात २५ सप्टेंबर रोजी पाणी पातळी २२५.८० मीटर असून एकूण पाणीसाठा १६.०७८ द.ल.घ.मी. आहे. अंजनी धरणातून शनिवारी दुपारी १ वाजता पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. गेल्या वर्षी अंजनी धरण ऑगस्ट महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र या वर्षी तब्बल एक महिना उशिरा धरण पूर्ण भरले आहे.
या वेळी गिरणा पाटबंधारे उपविभागाचे सुभाष चव्हाण, विजय जाधव, लोकांक्षी पांडुरंग पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, रमेश महाजन, जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर व राजेंद्र चौधरी, दिलीप रोकडे, नगरसेवक चिंतामण पाटील, अनिल महाजन, आनंदा चौधरी, शालीग्राम गायकवाड, नितीन बिर्ला, राजेंद्र महाजन, नगरसेवक कुणाल महाजन, परेश बिर्ला आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : अंजनी धरणस्थळावर जलपूजन करताना आमदार चिमणराव पाटील. सोबत आनंदा चौधरी, नानाभाऊ महाजन, राजेंद्र चौधरी, दिलीप रोकडे, किशोर निंबाळकर, चिंतामण पाटील आदी.