पहूर ता.जामनेर : बैलगाडीचा कारला धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरुन एकमेकांना शिवागीळ करीत दोन गटात हाणामारी झाल्याची घटना बुधवार ५ रोजी संध्याकाळी घडली होती याप्रकरणी पहूर पोलिसात दोन्ही गटांकडून परस्परांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांच्या माहिती नुसार भारूडखेडा येथील रहिवासी स्वप्निल शेनफडू सपकाळे यांच्या कारला ऋषीकेश लक्ष्मण होडगर यांच्या बैलगाडीचा धक्का लागल्याची घटना घडली होती. कारचे झालेले नुकसान सपकाळे याने भरपाईची मागणी संबंधितांकडे केली. याचा राग आल्याच्या कारणावरून ऋषीकेश लक्ष्मण होडगर, ज्ञानेश्वर रामचंद्र देवकर, वामन रामचंद्र देवकर, क्रुष्णा सखाराम होडगर, निवृत्ती लक्ष्मण होडगर (सर्व रा भारूडखेडा) यांनी जातीय वाचक शिविगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या आईसोबत गैरवर्तन केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. यावरून वरील पाच जणांना विरुद्ध पहूर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. तपास पाचोरा विभागाचे डीवायएसपी केशव पातोंड करीत आहे.दुसऱ्या गटातर्फे देखील फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार बैलगाडीचा कारला धक्का लागल्याच्या कारणावरून स्वप्नील शेनपडू सपकाळे, शेनपडू तुकाराम सपकाळे स्वाती सपकाळे, व जागृती सपकाळे (रा.भारूडखेडा) या चौघांनी कल्पना लक्ष्मण होडगर यांना शिवीगाळ करून डोक्यातील केस उपटले. तसेच महिलेसोबत गैरवर्तन करीत गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीची पाच तोळे वजनाची सोन्याची पोत ओढून घेतली आहे. व आमच्या नांदी लागू नका तुम्हाला जिंवत सोडणार नाही अशी धमकी दिली असे कल्पना होडगर यांनी दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे. यावरूण वरील चौघांविरूध्द भादवि.३९२, ३५४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक किरण बर्गे करीत आहे. याची प्रत्यक्ष पाहणी डिवायएसपी. नजीर शेख यांनी घटनास्थळी जाऊन केली आहे.
भारूडखेडा येथे बैलगाडीच्या धक्क्यामुळे दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 11:46 PM
बैलगाडीचा कारला धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरुन एकमेकांना शिवागीळ करीत दोन गटात हाणामारी झाल्याची घटना संध्याकाळी घडली होती
ठळक मुद्देपहूर पोलिसात गुन्हा दाखलदोन्ही गटांतर्फे परस्परांविरूद्ध गुन्हे५० हजारांची पोत लांबविल्याचा आरोप