आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ : शेतातील कृषी पंपाचे नुकसान केल्याच्या कारणावरुन सुभाषवाडी, ता.जळगाव येथे बुधवारी रात्री दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यावेळी कुºहाड, लोखंडी रॉड व दगडांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. यात सरपंचासह दोन्ही गटाचे ९ जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटाच्या ५६ जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न व दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
दगड, काठ्या, रॉड व कुºहाडीचा सर्रास वापर याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुभाषवाडी येथील नवलसिंग लाला राठोड यांच्या शेतातील कृषी पंपाचे २२ आॅक्टोबर रोजी नुकसान झाले होते. त्या कारणावरुन बुधवारी रात्री आठ वाजता गावातील सेवालाल मंदिराच्या चौकात सरपंच रामदास बंडू चव्हाण व रजेसिंग सरदार राठोड यांच्या गटात वाद झाला. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही गटाचे लोक एकमेकाच्या अंगावर धावले. दगड, काठ्या, रॉडचा वापर झाला. काही जणांनी कुºहाडी काढल्या. त्यामुळे गावात सर्वत्र पळापळ झाली.
दोन्ही गटाचे ९ जखमीया हल्ल्यात रजेसिंग सरदार राठोड, दरबार बाबुलाल राठोड, सोमा सरदार राठोड व इंदल सरदार राठोड हे तर विरोधी गटाचे सरपंच रामदास चव्हाण, प्रेमराज सरदार राठोड, चरणदास बंडू चव्हाण, शालिकराम सिताराम चव्हाण व सिताराम चंदू राठोड असे ९ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिरुध्द आढाव, उपनिरीक्षक नीलेश सोळुंखे, योगेश शिंदे, बाळकृष्ण पाटील, महेंद्रसिंग पाटील, भास्कर ठाकरे व समाधान पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
यांच्यावर दाखल झाले गुन्हेसरपंच रामदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन रजेसिंग सरदार राठोड, जगन दगडू राठोड, अनिल जगन राठोड, मिथून जगन राठोड, धोंडू उखा चव्हाण, ईश्वर धोंडू चव्हाण, आप्पा गुलाब राठोड, बाजीराव गुलाब राठोड, अर्जुन सोनसिंग राठोड, जयसिंग फुलसिंग राठोड, ज्ञानेश्वर जयसिंग राठोड, बाळू धनसिंग राठोड, भारत धनसिंग राठोड, सोमा सरदार राठोड, गंगाराम सेटू पवार, रवींद्र गंगाराम पवार, दरबार बाबुलाल राठोड, रमेश बाबुलाल राठोड, नवल छगनदास राठोड, ज्ञानदास सरदार राठोड, राहूल सोमा राठोड, पंकज सोमा राठोड, इंदल सरदार राठोड व अन्य दोन ते तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक नीलेश सोळुंखे करीत आहेत.
सरपंच गटाच्या ३३ जणांवर गुन्हेराजेसिंग सरदार राठोड यांच्या फिर्यादीवरुन सरपंच रामदास बंडू चव्हाण,प्रेमराज सरदार राठोड, बाळू पराग चव्हाण, पंडीत पराग चव्हाण, तुकाराम सिताराम राठोड, शालिक सिताराम राठोड, सिताराम चत्रू राठोड, श्रीराम परशुराम राठोड, तुळशीराम परशुराम राठोड, राहूल पंडीत चव्हाण, ज्ञानदास बंडू चव्हाण, अमरसिंग सरदार राठोड, बद्दू सरदार राठोड, अनिल प्रेमराज राठोड, रायसिंग गुलाब राठोड, साहेबराव गुलाब राठोड, अनिल रामदास चव्हाण, सुनील चरणदास चव्हाण, लखन रामदास चव्हाण, युवराज सुरुपचंद राठोड, प्रेमसिंग त्र्यंबक राठोड, मलखान हिरा राठोड, संदीप जंगी चव्हाण, जगन लालचंद राठोड, विलास श्रावण राठोड, कैलास श्रावण राठोड, चरणदास बंडू चव्हाण, ईश्वर ममराज चव्हाण, विनोद ममराज पवार, आप्पा लालचंद राठोड, बापू लाला राठोड, विनोद पंडीत चव्हाण, परशुराम गजमल राठोड व इतर २ ते ३ अशांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक योगेश शिंदे करीत आहेत.