चाळीसगाव : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या नाशिकच्या पथकाने रविवारी दुकानांवर चाळीसगाव शहरात छापे टाकून २०० किलो प्लॅस्टीक जप्त केले. दुकानदारांना प्रत्येकी दहा हजाराचा दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान अचानक झालेल्या या कारवाईमुळे प्लॅस्टीक वस्तू विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.अष्टभुजा व्यापारी संकुलातील गायत्री प्लॅस्टीक व अंबिका स्वीट मार्ट आणि सावकर चौकातील नंदन दुग्धालयावर पथकाने रविवारी सायंकाळी साडे सात वाजता ही कारवाई केली. पथक प्रमुख दिनेश जाधव व सुधीर नकवाल यांच्या संयुक्त पथकाने प्लॅस्टीक विक्रेत्यांवर छापे घातले. यात २०० किलो प्लॅस्टीक वस्तू (कॅरीबॅग, कागदी वाट्या, पत्रावळी, द्रोण) यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मालाची किंमत २५ ते ३० हजार रुपये आहे.यापूर्वी देखील पालिका पथकाने या दुकानदारांवर कारवाई केली असून प्रत्येकी पाच हजार दंडही वसूल केला आहे.
चाळीसगावला दोनशे किलो प्लॅस्टीकचे साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:39 PM
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या नाशिकच्या पथकाने रविवारी दुकानांवर चाळीसगाव शहरात छापे टाकून २०० किलो प्लॅस्टीक जप्त केले.
ठळक मुद्देचाळीसगावात प्रदूषण मंडळ पथकाची कारवाईप्लॅस्टीकच्या वस्तूंचा वापर करणाऱ्या दुकानदारांना दहा हजाराचा दंड२५ ते ३० हजारांचा माल जप्त