धरणगाव : येथे नव्याने बांधण्यात आलेल्या नगरपालिकेच्या बांधकामावेळी खोदकामात दोन शिलालेख आढळून आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूला पडून होते. ग्रामीण रुग्णालय येथे सध्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामाचे ठेकेदार व इतिहासाचे अभ्यासक उज्ज्वल पाटील यांना हे शिलालेख निदर्शनास आले. यासंदर्भात त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना याबाबत माहिती दिल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तत्काळ दखल घेत पुरातत्त्व विभाग औरंगाबाद यांच्याशी संपर्क करून याबाबत माहिती दिली. याबाबत औरंगाबाद विभागाने रविवारी याठिकाणी भेट दिली.
पुरातत्त्व विभाग औरंगाबाद येथील भुजंगराव बोबडे, राज्य करसहायक आयुक्त समाधान महाजन, इतिहासकार सुशीलकुमार आहेरराव, धरणगाव येथील नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, उज्ज्वल पाटील यांनी भेट देऊन प्रत्यक्ष तपासणी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव येथे ब्रिटिशांची मुख्य वसाहत होती. खान्देशची राजधानीदेखील धरणगाव होती. येथे ब्रिटिशांच्या कंपन्या होत्या. याठिकाणी आढळलेल्या दोन शिलालेखांवरील एका शिलालेखावर इंग्रजी आणि दुसऱ्या शिलालेखावर मराठी या दोन्ही भाषांत माहिती विशद केलेली आहे. ब्रिटिशकाळात लंडन येथे जन्मलेले लेफ्टनंट सर जेम्स औकट्रम हे ब्रिटिशांचे सेनापती होते. त्यांचा उल्लेख यावर दिसून येतो. लेफ्टनंट औकट्रम यांनी धरणगाव येथे भिल्लबांधवांच्या तुकड्यांची स्थापना केली.
सध्याचे ग्रामीण रुग्णालय हे तेव्हा जिल्हा कार्यालय होते. १८२५ ते १८३५ या १० वर्षांच्या कालावधीत औकट्रम हे धरणगाव येथे राहायचे. धरणगाव येथील कार्यामुळे त्यांना संपूर्ण जगभरात प्रसिद्धी मिळाली. ‘बेयर्ड एक निष्कलंक आणि निर्दोष सरदार’ ही एक मोठी मानली जाणारी पदवी आहे. ही पदवी या औकट्रम यांना मिळाली होती. या पदवीचा उल्लेख या शिलालेखावर करण्यात आला आहे.
लेफ्टनंट औकट्रम या याठिकाणी असताना साधे लेफ्टनंट म्हणून ते कार्यरत होते, जे नंतर ब्रिटिशांचे लेफ्टनंट जनरल, ब्रिटिशांचे सेनापती म्हणून कार्यरत झाले. औकट्रमच्या नावाने घाटदेखील आहे. त्यांचा पुतळा कलकत्ता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथेदेखील आहे. एवढ्या महान हस्तीचा उल्लेख भारतातच नव्हे तर जगात इतकी सविस्तर माहिती देणारा हा एकमेव शिलालेख आहे, अशी माहिती पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
पुरातत्व विभाग औरंगाबाद येथील भुजंगराव बोबडे, राज्य कर सहायक आयुक्त समाधान महाजन, इतिहासकार सुशीलकुमार आहेरराव, धरणगाव येथील नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, उज्वल पाटील यांनी भेट देवून प्रत्यक्ष तपासणी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
धरणगाव येथे ब्रिटीशांची मुख्य वसाहत होती. खान्देशची राजधानी देखील धरणगाव होती. येथे ब्रिटीशांच्या कंपन्या होत्या. याठिकाणी आढळलेल्या दोन शिलालेखावरील एका शिलालेखावर इंग्रजी आणि दुसऱ्या शिलालेखावर मराठी या दोन्ही भाषेत माहिती विषद केलेली आहे. ब्रिटीश काळात लंडन येथे जन्मलेले लेफ्टनंट सर जेम्स औकट्रम हे ब्रिटीशांचे सेनापती होते त्यांचा उल्लेख यावर दिसून येतो. लेफ्टनंट औकट्रम यांनी धरणगाव येथे भिल्ल बांधवांच्या तुकड्यांची स्थापना केली. सध्याचे ग्रामीण रुग्णालय हे तेव्हा जिल्हा कार्यालय होते. १८२५ ते १८३५ या १० वर्षाच्या कालावधीत औकट्रम हे धरणगाव येथे राहायचे. धरणगाव येथील कार्यामुळे त्यांना संपूर्ण जगभरात प्रसिद्धी मिळाली. ‘बेयर्ड एक निष्कलंक आणि निर्दोष सरदार’ हि एक मोठी मानली जाणारी पदवी आहे हि पदवी या औकट्रम यांना मिळाली होती. या पदवीचा उल्लेख या शिलालेखावर करण्यात आला आहे.
लेफ्टनंट औट्रम या याठिकाणी असतांना साधे लेफ्टनंट म्हणून ते कार्यरत होते जे नंतर ब्रिटीशांचे लेफ्टनंट जनरल, ब्रिटीशांचे सेनापती म्हणून कार्यरत झालेत. औट्रम च्या नावाने घाट देखील आहे. त्यांचा पुतळा कलकत्ता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे देखील त्यांचा भव्य पुतळा आहे. एवढ्या महान हस्तीचा उल्लेख भारतातच नव्हे तर जगात इतकी सविस्तर माहिती देणारा हा एकमेव शिलालेख आहे. अशी माहिती पुरातत्व विभागाचे अधिकारी यांनी येवेळी दिली.
सध्याच्या परिस्थितीत हे शिलालेख कचऱ्यात धूळखात पडलेले असून या शिलालेखांचे जतन करण्याची गरज असल्याचे मत इतिहास अभ्यासक उज्वल पाटील यांनी व्यक्त केले. प्रसंगी त्यांनी शहरातील काही जुन्या ठिकाणांना देखील भेट दिली.
सूचना.......... सर कृपया तपासून पाहावी. बातमी दाेनतीन वेळा पेस्ट झाली आहे.
050721\05jal_1_05072021_12.jpg
धरणगाव पालिका बांधकामावेळी आढळले दोन शिलालेख..