सुशील देवकरजळगाव,दि.९ : बोंडअळीमुळे जिल्ह्यातील २ लाख १५ हजार ३९४ शेतकऱ्यांच्या ३ लाख ८९ हजार ६८ हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागातर्फे राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. राज्य शासनाला केंद्राकडून मदतीची मागणी करावयाची असल्याने तातडीने ही आकडेवारी पाठविण्यात आली असल्याचे समजते. दरम्यान, कपाशी उपटून फेकलेल्या शेतकऱ्यांनाही सातबारावरील नोंदी गृहीत धरून व शपथपत्र घेऊन नुकसान भरपाईचा लाभ दिला जाणार आहे. शासन सरसकट नुकसान भरपाईची घोषणा नागपूर अधिवेशनात करण्याची शक्यता आहे.नुकसानीत दोन प्रकारपुणे येथे कृषी आयुक्तांकडे गुरुवारी राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात कापसाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले असे शेतकरी व ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेले शेतकरी असे दोन प्रकार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यातील कापसाच्या १०० टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कापसाच्या एकूण ४ लाख ७५ हजार ९४७ हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख ८९ हजार ६८ हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने राज्य शासनाला दिला आहे. त्यातही २ हेक्टरच्या आतील क्षेत्र असलेले शेतकरी व २ हेक्टरच्या वर क्षेत्र असलेले शेतकरी असे दोन प्रकार करण्यात आले आहेत. त्यात २ हेक्टरच्या आत क्षेत्र असलेल्यांमध्ये १ लाख ५२ हजार ६१३ शेतकरी असून, त्यांचे क्षेत्र १ लाख ६४ हजार १४९ हेक्टर आहे. तर २ हेक्टरच्यावर क्षेत्र असलेल्या शेतकºयांची संख्या ६२ हजार ७८१ हेक्टर आहे. त्यांचे एकूण क्षेत्र २ लाख २४ हजार ९१९ हेक्टर आहे.आतापर्यंत ८९ हजार शेतकऱ्यांनी केली तक्रारखराब बियाण्यामुळे कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याबाबत जी फॉर्ममध्ये ८९ हजार ७०३ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या ६९ हजार ६५ हेक्टर क्षेत्रापैकी १७६७ शेतकऱ्यांच्या १४०७ हेक्टर क्षेत्रावर पंचनामा झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील २ लाखावर शेतकऱ्यांना बोंडअळीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 11:29 AM
३ लाख ८९ हजार हेक्टरवर बोंडअळीमुळे नुकसान : सरसकट मिळणार नुकसान भरपाई
ठळक मुद्देआतापर्यंत ८९ हजार शेतकऱ्यांनी केली तक्रारबोंडअळीच्या नुकसानीत दोन प्रकारसरसकट मिळणार नुकसान भरपाई