चोपडा,दि.13- तालुक्यातील विरवाडे येथे मध्यरात्री अज्ञात चोरटय़ांनी घरफोडी करुन कपाटातील सुमारे दोन लाखाचे सोने व 20 हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. तसेच आडगाव येथेही पाच घरांचे कुलुप तोडून चोरीचा प्रय} झाला.
विरवाडे येथील अशोक सुकलाल राजपूत हे परिवारासह खरदे (ता.दोंडाईचा) येथे गेले होते. घर बंद असल्याची साधत चोरटय़ांनी बुधवारी मध्यरात्री राजपूत यांच्या घरातील लहान कपाट, अन्य भिंतीतील कपाट, व एका कॉट मधील सामान अस्ताव्यस्त फेकले. चोरटय़ांनी मोठय़ा पत्री कपाटातील लॉकर तोडून त्यातील सोन्याचे दागिने व 20 हजार रुपये रोख असा सुमारे सव्वादोन लाखाचा ऐवज लांबलेला आहे .याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचे काम सुरु आहे
घटनेचे गांभीर्य पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे , पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील , सपोनि रामकृष्ण पावरा ,पोउनि कांचन काळे, कॉ प्रवीण मांडोळे , किशोर पाटील , राजेश पाटील यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करीत संपूर्ण गावाचा परिसर पिंजून काढला.
जळगाव येथील हॅप्पी या श्वानास घेऊन हवालदार संदीप परदेशी ,कॉ मनोज पाटील चालक हवालदार दर्शन बोरसे यांचे पथक दाखल झाले आहे.
आडगाव येथे पाच घरे फोडले
आडगाव ता.चोपडा येथे रमण महादू पाटील, पूना धुडकू कुंभार , राजेंद्र किसन कुंभार , हिरामण शंकर पाटील व चंदूलाल देवराम पाटील यांच्या घरांची कुलपे तोडून आतील साहित्य फेकले. यात रमण महादू पाटील यांच्या घरातील 50 किलो गहू चोरी झाला आहे.