जळगाव : विमानतळावर पुन्हा एकदा दोन बिबट्याचे दर्शन झाले आहे. ट्रॅप कॅमेऱ्यामध्येही दोन बिबटे आढळून आले आहेत.बिबटे दिसल्याची माहिती मिळताच वनविभागाने समिती नेमून बिबट्यांच्या अस्तित्वाबाबत खात्री करून घेतली. वनविभागाने ११ मे रोजी एका बिबट्याला पकडले होते. मात्र त्याला दुसरीकडे नेऊन सोडल्यावरही तो बिबट्या विमानतळावर परत आला आहे. हे बिबटे पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान भितीमुळे ३० एप्रिलपासून विमानतळावरील काम बंदच असल्याचे समजते. वनविभागाने पकडलेल्या बिबट्याला दुसरीकडे जंगलात नेऊन सोडण्यात आल्यानंतरही दुसरा बिबट्या दिसल्याने भितीचे वातावरण तयार झाले होते. त्यातच वनविभागाने दुसरीकडे नेऊन सोडलेला बिबट्याही परतल्याने भितीत वाढ झाली. त्यामुळे विमानतळाचे कामकाज बंदच ठेवण्यात आले. विमानतळाच्या परिसरात प्रवेशासाठी अनेक चोरवाटा असून त्या बंद करण्याची गरज असल्याचे वनविभागाने विमानतळ प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र दोन बिबटे पुन्हा दिसल्याने या वाटा बंद करण्याचे कामही सुरू होऊ शकलेले नाही.विमानतळावर बिबट्याचा वावर झालाय नेहमीचाचसप्टेंबर २०१८ मध्ये विमानतळावर खोदकाम सुरु असताना बिबट्याचा एका बछड्याचा मृत्यू झाला होता. तसेच ८ आॅक्टोबर २०१८ रोजी बिबट्यांचा भितीमुळे मुख्यमंत्र्यांचे विमान उतरवण्यासाठी सीएमओ आॅफीस ने विमानतळ प्रशासनाकडून संपूर्ण माहिती व सुरक्षेविषयीची पडताळणी केल्यानंतरच विमान उतरविण्यासाठी परवानगी दिली होती.३० एप्रिल पासून बंद आहे विमानतळावरील काम२८ व २९ एप्रिल रोजी विमानतळावर बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर विमानतळ प्रशासनाने याबाबत वनविभागाकडे माहिती कळविल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून एक बिबट्या पकडला होता. तर दुसरा बिबट्या पकडण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती.साधारणपणे ३० एप्रिलपासून विमानतळ प्रशासनाने या ठिकाणी सुरु असलेली सर्व कामे थांबवली असून, कर्मचारी देखील काम करण्यास धजावत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या ठिकाणी असलेल्या बिबट्याच्या प्रवेशाच्या वाटा बंद करण्याचे कामही बिबटे पकडल्याशिवाय शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले.दोन बिबटे दिसल्याची माहिती मिळताच वनविभागाने समिती नेमून बिबट्यांच्या अस्तित्वाबाबत खात्री करून घेतली. ट्रॅप कॅमेºयामध्येही दोन बिबटे आढळून आले. त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवून दोन्ही बिबटे पिंजरे लावून पकडण्याची परवानगी मागण्यात आली. ती मिळाली असून लवकरच हे बिबटे पकडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जळगाव विमानतळावर दोन बिबट्यांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 12:08 PM