जळगाव : दोन लाखाचा धनादेश अनादर झाल्याप्रकरणी विकास बबन लकडे (रा.एमआयडीसी, जळगाव) यांना न्यायालयाने दोन महिने साधा कारावास व नुकसान भरपाई म्हणून अडीच लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्या.रुपाली सिदनाळे यांनी हा आदेश दिला.बबन लकडे यांनी सुनील शेषराव चोथवे (रा.म्हाडा कॉलनी, जळगाव) यांच्याकडून २०१४ मध्ये हातउसनवारी म्हणून व्यापारासाठी दोन लाख रुपये घेतले होते. धनादेशाद्वारे हा व्यवहार झाला होता. लकडे यांनी मुदतीत पैसे परत केले नाहीत. त्यानंतर त्यांनी दाने लाखाचा धनादेश दिला. तो बॅँकेत वटला नाही. त्यामुळे चोथवे यांनी लकडे यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली, तरीही त्यांनी पैसे दिले नाहीत, म्हणून चोथवे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्या. रुपाली सिदनाळे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात एक साक्षीदार तपासण्यात आला. आरोपीविरुध्द पुरावा सिध्द झाल्याने न्यायालयाने लकडे यांना दोन महिने साधा कारावास व अडीच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. फिर्यादी सुनील चोथवे यांच्याकडून अॅड.शरीफ एस.पटेल यांनी न्यायालयात बाजू मांडली.
धनादेश अनादरप्रकरणी दोन महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 10:10 PM