जळगाव : गटशिक्षणाधिकारी आऱडी़ महाजन यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्यासह आठ जणांविरूध्द खंडणीचागुन्हादाखलझालाआहे.यामध्येविद्यार्थ्यावर अत्याचार करणेतसेच प्रेम प्रकरण असल्याचे सांगत वृत्तपत्रातून बदनामी करण्याची धमकी देऊन दोन लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चोपडाई कोंढावळ (ता़ अमळनेर) येथील सद्गुरू पब्लिक स्कूलचे चेअरमन संजय व्यास यांच्या फिर्यादीवरून हागुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षण विभागाने तात्काळ अमळनेर गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत़प्राचार्यांना शिवीगाळ केली म्हणून २४ फे बु्रवारी रोजी चोपडाई कोंढावळ येथील सद्गुरू पब्लिक स्कूलचे चेअरमन यांनी एका विद्यार्थ्यास शिक्षा केली होती़ याबाबत विद्यार्थ्याने पालकाला सांगितल्यानंतर पालकाने गटशिक्षणाधिकारी आऱडी़महाजन यांच्याकडे तक्रार केली होती़ त्यानुसार २८ फेब्रुवारी रोजी गटशिक्षणाधिकारी यांनी चेअरमन व्यास यांना फोन लावून विद्यार्थ्यांवर तुम्ही अत्याचार करीत आहात असे सांगत मी पत्रकारांसोबत आपल्याकडे येत असल्याचे सांगितले़ नंतर गटशिक्षणाधिकांनी जितू ठाकूर, महेंद्र रामोसे, मुन्ना शेख, संजय पाटील व इतर दोन जणांसोबत शाळा गाठली़ तुमचे प्रेम प्रकरण सुरू आहे़ तसेच विद्यार्थ्यांवर अत्याचार सुध्दा करीत आहात, हे वृत्तपत्रात छापून बदनामी करू नाही तर दोन लाख रूपये द्या, अशी खंडणी व्यास यांच्याकडे मागितली़ त्याप्रसंगी विद्यार्थ्याला पालकाच्या भूमिकेने शिक्षा केल्याचे व्यास यांनी गटशिक्षणाधिकाºयांना सांगितले़ त्यावर महाजन यांनी दोन लाख रूपये पत्रकारांना देवून टाका नाही तर तुमची बदनामी करतील असेसांगितले़ मात्र, पंचवीस हजार रूपये माझ्याजवळ असल्याचे सांगत व्यास यांनी ती रक्कम जितू ठाकूर यांच्या हातात दिली़ अखेर या प्रकरणाबाबत कुठलीही वाच्यता न फोडण्याची धमकी त्या आठ जणांनी दिली़ त्यानंतर मंगळवारी रात्री १० वाजता अमळनेर पोलीस ठाणे गाठत शाळेचे चेअरमन यांच्या फिर्यादीवरून दोन लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी आऱडी़महाजन, जितू ठाकूर, महेंद्र रामोसे, मुन्ना शेख, संजय पाटील यांच्यासह दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दरम्यान, या प्रकरणी शिक्षण विभागाला कुठलीही माहिती नसल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. मात्र विनयभंग प्रकरण गटविकास अधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.गटविकास अधिकाºयांना पाठविले पत्र२८ फेब्रुवारी रोजी गटशिक्षणाधिकारी आऱडी़महाजन यांनी विनयभंग केला म्हणून त्यांच्यावर ५ मार्च रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी शिक्षण विभागाने अमळनेर गटविकास अधिकारी यांना तात्काळ पत्र काढून संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश केले आहेत़ दरम्यान, विनयभंग व खंडणीच्या गुन्ह्यातील संशयित गटशिक्षणाधिकारी हे फरार असल्याची माहिती समोर आली आहे़
सात दिवसात दोन गुन्ह, शिक्षण विभागाने मागविला अमळनेरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:52 PM