श्यामकांत सराफपाचोरा : ऑक्सिजन सिलिंडर संपल्याने पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील ३० रुग्णांचा जीव रामभरोसे झाला असतानाच प्रशासन खडबडून जागे झाले.भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे तत्काळ रुग्णालयात हजर होऊन ३ खाजगी हॉस्पिटलमधून उसनवारी सिलिंडर आणून पुरवठा सुरू केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान याच कालावधीत दोन रुग्णांचा ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. १ मेे रोजी हा प्रकार घडला.महेश राठोड (वय ३२, रा.कुऱ्हाड ब्रूद्रुक, ता.पाचोरा) व ग्यारसीबाई चव्हाण (वय ७६, रा.हनुमंतखेडा. ता.सोयगाव, जि. औरंगाबाद) अशी मयतांची नावे आहेत.यावेळी पाचोरा प्रांताधिकारी यांनी जिल्हास्तरावर १६ सिलिंडरची व्यवस्था केली असून लवकरच सिलिंडर घेऊन गाडी येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली. रुग्णालयातील ऑक्सिजन संपत असल्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवली असून, दि. २ रोजी दुपारी पाचोरा रुग्णालयाचा कोटा पोहोचणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी सांगितले.
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनअभावी दोन रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2021 00:23 IST