पाचोरा/ जळगाव : पाचोरा तालुक्यातील लासगावाजवळ भरधाव दुचाकी व प्रवासी रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८़१५ वाजेच्या सुमारास घडली़ यात दुचाकीवरील शुभम रविंद्र देशमुख (१९) व निलेश कैलास मोरे (२८), (दोन्ही रा़ राणीचे बांबरुड, ता़ पाचोरा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक अनिल सांगळे यांच्या छातीला व डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित तीन जणांवर पाचोऱ्यात उपचार सुरू आहे़राणीचे बांबरुड येथील शुभम आणि निलेश हे दोघे मित्र होते़ तसेच दोघे ट्रकचालक देखील होते़ काही दिवसांपूर्वी शुभमने मिनी मालट्रक विकत घेतला होता़ त्याची नवीन बॉडी बनविण्यासाठी हा ट्रक शुभम याने पाचोरा तालुक्यातील भोजे येथे टाकला होता़ दरम्यान, शुक्रवारी या ट्रकचे काम झाले की नाही, व त्या कामाचे पैसे देण्यासाठी शुभम हा मित्र निलेशसह दुचाकीने (क्रमांक़ एमएच़१९़सीटी़५९८९) भोजे येथे गेले होते़ रात्री पैसे दिल्यानंतर दोघे घरी जाण्यासाठी भोजेहून पाचोरा मार्र्गे राणीचे बांबरुडसाठी निघाले़ तेव्हा अनिल सांगळे (रा़ राणीचे बांबरुड) हे रिक्षात (क्रमांक़ एमएच़१९, एई़६९९२) प्रवासी घेऊन कुºहाड गावाच्या दिशेने जात होते़पाचोरा तालुक्यातील लासगाव फाट्याजवळून दोन्ही वाहने जात असताना दोघांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली़ दुचाकीवरील शुभम आणि निलेश हे रिक्षावर आदळून रस्त्याच्याकडेला फेकले गेले़ यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन दोघे जागीच ठार झाले़ तर रिक्षाचालक अनिल सांगळे व गरीब बाबू मदारी (२२), गंभीर कलीम मदारी (११) आणि गयास मदारी (१४) हे प्रवासी जखमी झाले़अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली़ त्यांनी त्वरीत १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिका बोलावून अपघातग्रस्तांना जिल्हा रूग्णालयात नेले़ तेथे वैद्यकीय अधिकाºयांनी दोघांना तपासून मृत घोषित केले़ त्यानंतर खाजगी वाहनातून रिक्षाचालक अनिल सांगळे यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले़
लासगावजवळ रिक्षा- दुचाकीच्या धडकेत २ ठार, ४ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 11:38 PM
पाचोरा तालुक्यातील लासगाव- नांद्रा दरम्यान प्रवासी रिक्षावर दुचाकी आदळून त्यात २ जण जागीच ठार तर इतर चार जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडला.
ठळक मुद्देअपघातील मयत राणीचे बांबरूडचे रहिवासीजखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू