जळगाव : रेल्वेत प्रवाशांशी दादागिरी करुन त्यांच्याजवळील मोबाईल व रोकड लुटणाºया सुरतच्या टोळीतील फरार असलेल्या दोघांनी शुक्रवारी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, दोघंही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांना बालनिरीक्षणगृहात दाखल केले आहे. अटकेतील दोघांना न्यायालयाने १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरत-भसावळ या पॅसेंजरमध्ये सहा जणांच्या टोळीने अमळनेरच्या प्रवाशांना मारहाण करुन मोबाईल हिसकावला होता. त्यातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर दोन जण फरार झाले होते. शेख कदीर शेख इब्राहीम (वय २०) वसीम शेख अजीज (वय २१) या दोघांना अटक करण्यात आली होती व दोन अल्पवयीन मुलांना बालनिरीक्षण गृहात दाखल करण्यात आले होते. अटकेतील दोघांना शुक्रवारी पोलिसांनी न्या. प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विविध साहित्य जप्तसरकारतर्फे अॅड.आशा शर्मा यांनी काम पाहिले. या टोळीकडून मिरची पूड, चाकू, दोर तसेच एक सीम कार्ड नसलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. शहरात टेहळणी करुन जबरी चोरी किंवा दरोडा टाकण्याचे नियोजन होते, असे चौकशीत निष्पन्न झाल्याचे सहायक निरीक्षक दीपक गंधाले यांनी सांगितले. दरम्यान, यातील शेख कदीर याच्याविरुध्द सुरत येथे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. अल्पवयीन मुलांचा वापर करुन गुन्हा करण्याचे नियोजन कदीर व वसीम यांनी केले होते.
लूटमारीच्या गुन्ह्यात आणखी दोघे ताब्यात
By admin | Published: March 18, 2017 12:35 AM