शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

चोरट्यांचा अजबचं फंडा ! डल्ला मारल्यानंतर चोरट्यांनी दुकानही जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 7:36 PM

जळगाव : चोरी करण्याच्या नवीन पध्दती आजपर्यंत चोरट्यांनी वापरल्याचे पहावयास किंवा ऐकीवात असेल़ मात्र, चोरी केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी ...

जळगाव : चोरी करण्याच्या नवीन पध्दती आजपर्यंत चोरट्यांनी वापरल्याचे पहावयास किंवा ऐकीवात असेल़ मात्र, चोरी केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी थेट दुकानच जाळण्याचा अजब फंडा चोरट्यांकडून आता वापरला जात आहे. शहरात अशा दोन घटना उघडकीस आल्या आहेत़ कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नंदलाल जीवनराम राठी व पुखराज अर्जुन प्रजापत यांच्या दुकानातून चोरट्यांनी सुमारे १ लाख ६५ हजार रूपयांची रोकड लंपास केली. घटना शनिवारी सकाळी ६़३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे़ विशेष म्हणजे, चोरट्यांनी चोरी केल्यानंतर दोन्ही दुकाने पेटवून दिल्यामुळे सुमारे १ लाख ४० हजार रूपयांचे नुकसानही झाले आहे़ याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नंदलाल राठी हे कुटूंबीयांसह शाहुनगरात वास्तव्यास आहेत़ त्यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० क्रमांकाचे दुकान आहे़ या दुकानातून धान्य व बारदानाची विक्री केली जाते़ या कामासाठी त्यांना शालक प्रकाश डोडीया हे मदत करतात़ तसेच त्यांच्या दुकानाच्या रांगेतच पुखराज प्रजापत यांचेही बारदान विक्रीचे दुकान आहे़ शुक्रवारी सायंकाळी सात वाजता कामकाज आटोपल्यानंतर दुकानाला कुलूप लावून नंदलाल व त्यांचे शालक हे घरी निघून गेले़ दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ६़३० वाजता नंदलाल यांना राजेश प्रजापत यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की, तुमच्या दुकानाचे शर्टर अर्धवट उघडे असून दुकानातून धूर निघत आहे़ लागलीच त्यांनी ही बाब शालकाला सांगितली व दोघे दुकानाच्या ठिकाणी आले़रोकड लंपास तर कागदपत्र, इतर साहित्य जळून खाकराठी व डोडीया यांनी दुकानाची पाहणी केली असता, त्यांना चोरट्यांनी गल्लयातील पाच हजार रूपये चोरून नेल्याचे दिसून आले़ त्याचबरोबर दुकानाला आग लावल्याचे दिसले़ या आगीत जमा-खर्च वही, पास बुक, चेक बुक तसेच जंगम मालमत्तेची खरेदी-विक्री व्यवराहाराची संपूर्ण कागदपत्रे, जीएसटीची कागदपत्रे यासह इर्न्हरटर, ए़सी़ व इतर साहित्य असे सुमारे १ लाख रूपये किंमतीचे नुकसान झाल्याचे दिसून आले़दुसºया दुकानातून लांबविली १ लाख ३५ हजारांची रोकडचोरट्यांनी राठी यांच्या दुकानासोबतच जवळच असलेल्या पुखराज अर्जुन प्रजापत यांच्या दुकानामध्येही डल्ला मारून सुमारे १ लाख ३५ हजारांची रोकड लंपास केल्याचेही समोर आले़ त्याठिकाणी पाहणी केली असता चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेºयाची हार्डडिस्क तसेच डीव्हीआर, टीव्ही, नेट राऊटर असे २५ हजाराचा ऐवजही चोरून नेल्याचे आढळून आले़खुर्ची, एसी जळून खाकप्रजापत यांच्या दुकानातही चोरी केल्यानंतर चोरट्यांनी दुकान पेटवून दिले होते़ त्यात दुकानातील खुर्ची, ए़सी़तसेच फर्नीचर व इतर साहित्य जळून खाक झाले असून सुमारे चाळीस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे़ दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीही याच प्रकारे शाहुनगरातील एका दुकानात चोरी करून पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली होती़पोलिसात गुन्हा दाखलबाजार समितीतील दोन दुकानांमध्ये चोरी करून पेटवून दिल्याची घटना उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मुद्दस्सर काझी, असीम तडवी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली़ तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासणीचे कामकाज सुरू आहे़ याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नंदलाल राठी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव