२१ जानेवारीपासून सुरू होणारी मुंबई-नागपूर (गाडी क्रमांक ०२१६९-७०) ही गाडी मुंबईहून दररोज दुपारी ३ तीन वाजता निघून, जळगावला रात्री पावणेदहा वाजता येणार आहे. तर नागपूरला सकाळी पावणेसहा वाजता पोहोचणार आहे. तर नागपूरहून मुंबईला जाताना जळगावला ही गाडी पहाटे सव्वाचार वाजता येणार आहे. तसेच नागपूर-अहमदाबाद (गाडी क्रमांक ०११३७-३८) ही साप्ताहिक गाडी फक्त बुधवारी धावणार असून, या गाडीला भुसावळसह जळगावलाही थांबा देण्यात आला आहे. नागपूरहून अहमदाबादला जाण्यासाठी जळगावला दुपारी अडीच वाजता येणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी नागपूरला जाण्याकरिता जळगावला पहाटे ३ वाजता येणार आहे.
इन्फो :
या गाड्यानांही जनरल तिकीट बंद
रेल्वे प्रशासनातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या दोन्ही गाड्यांना फक्त तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशानांच प्रवेश देण्यात येणार आहे. तर सर्वसामान्य प्रवाशासांठी जनरल तिकीट बंदच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक प्रवासी किंवा चाकरमान्यांना आरक्षण करूनच प्रवास करावा लागणार आहे.