आॅनलाईन लोकमतजळगाव दि,३० : मेहरुण तलावात पोहायला गेलेल्या मोहम्मद दानिश मो.युसुफोद्दीन (वय १३) व मोहम्मद खलिक अनिसोद्दीन पिरजादे (वय १४) दोन्ही रा. पिरजादे वाडा, मेहरुण, जळगाव या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी चार वाजता घडली. दोन्हीही मुले मेहरुणमधील मनपा शाळेचे विद्यार्थी आहेत.
पोहता येत नसल्याने बेतले जीवावरयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मोहम्मद दानिश व मोहम्मद खलिक हे दोन्ही दुपारी तीन वाजता मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेले होते. शेती शिवार असलेल्या परिसरात ते गुडघ्याबरोबर असलेल्या पाण्यात पोहत असताना अचानक पुढे गेले व तेथे असलेल्या खोल खड्डयात बुडाले. दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांनी पाण्याच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना अपयश आले.दोन तरुण धावले मदतीला..पाण्याच्या डोहात दोन मुले बुडाल्याचे लक्षात येताच तलावाच्या काठी म्हशी चारणाºया गुराख्याने धाव घेतली. त्याचवेळी मेहरुण, पिरजादे वाड्यातील कफील अहमद पिरजादे व जमील नवास अकीलोद्दीन पिरजादे हे शेतातून घराकडे येत असल्याने गुराख्याने त्यांना ही घटना सांगितली. या दोन्ही तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली. दोघांना बाहेर काढले. तत्पूर्वी समाजवादी पक्षाची रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविण्याचा निरोप सहकाºयांना देण्यात आला होता. ही रुग्णवाहिका दाखल होताच त्यातून दोघांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा वाटेतच मृत्यू झालेला होता.
दोन्ही एकाच शाळेचे विद्यार्थीदानिश व खलिल हे दोन्ही मेहरुणमधील मनपाच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. दानिश सहावी तर खलिल सातवीचा विद्यार्थी आहे. दोघांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीचीच आहे. आई, वडील शेती व मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. खलील याच्या पश्चात दोन भाऊ तर दानिश याच्या पश्चात चार भाऊ आहेत.