जळगाव : वाळू गटांची मुदत संपली असली तरी अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईत आव्हाणे रस्त्यावरून दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री १०.३० ते शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत महसूल व पोलीस पथकाने ही कारवाई केली.गुरुवारी रात्री जिल्हा गौण खनिज अधिकारी दीपक जाधव, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह ,सहा तलाठी, १२ पोलीस कर्मचारी अशा महसूल व पोलीस खात्याच्या संयुक्त पथकास कारवाई दरम्यान आव्हाणे रस्त्यावर एक वाळूने भरलेले ट्रॅक्टर व एक रिकामे ट्रॅक्टर आढळून आले. त्या वेळी पथकाने हे दोन्ही ट्रॅक्टर जप्त केले.त्यानंतर किनोद, विदगाव, वाघनगर परिसर या भागातही सकाळी सहा वाजेपर्यंत पाहणी केली. मात्र केवळ आव्हाणे रस्त्यावर दोन ट्रॅक्टर आढळून आले. यातील एक ट्रॅक्टर शहर पोलीस ठाणे तर एक ट्रॅक्टर ग्रामीण पोलीस ठाण्यात लावण्यात आले. यात सव्वा लाखापर्यंत दंड केला जाणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.चाकातील हवा सोडून देणारवाळू वाहतूक करणारे वाहन जप्त केल्यानंतर ते पळवून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. यापुढे असा प्रकार घडू नये म्हणून जप्त वाहनांच्या चाकातील हवा सोडून दिली जाईल, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.अवैध वाळू वाहतूकदारांना माहिती पुरविण्याऱ्या विरोधात तक्रारगुरुवारी रात्री अवैध वाळू वाहतूक विरोधात कारवाई करीत असताना मध्यरात्री नंदगाव शिवारात अवैध वाळू वाहतूकदारांना माहिती पुरविणाºया पुंडलिक पंढरीनाथ सोनवणे, रा. देवगाव या संशयिताविरुद्ध तहसीलदार अमोल निकम यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदर इसम पथकाच्या वाहनावर लक्ष ठेवून अवैध वाळू वाहतूकदारांना त्याची माहिती देत असण्याचा संशय असल्याने भ्रमणध्वनीची तपासणी करण्याची मागणी केली आहे.
जळगावात अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:18 PM
रात्रभर तपासणी
ठळक मुद्देमहसूल व पोलीस पथकाची संयुक्त कारवाईअवैध वाळू वाहतूकदारांना माहिती पुरविण्याऱ्या विरोधात तक्रार