शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

दोन दुचाकींच्या धडकेत जानव्याचा दूध विक्रेता ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 23:20 IST

जानवे येथील तरुणाच्या दुचाकीस समोरून येणाऱ्या मोटारसायकलने धडक दिल्याने दूध विक्रेता जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

ठळक मुद्देशनिवारी रात्री डांगर गावाजवळची घटना.

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : धुळ्याहून दूध विक्री करून येणाऱ्या जानवे येथील तरुणाच्या दुचाकीस समोरून येणाऱ्या मोटारसायकलने धडक दिल्याने दूध विक्रेता जागीच ठार झाल्याची घटना २६ रोजी रात्री साडेअकरा वाजता डांगर गावाजवळ घडली.

आधार लखा उर्फ लक्ष्मण पाटील (४२, जानवे) हे दररोज दूध विक्रीसाठी धुळे येथे जात असतात. २६ रोजी ते रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास धुळ्याहून दूध विक्री करून मोटारसायकल (एमएच १९ बीई ८७९०) ने परत जानवे गावी येत असताना डांगरजवळील तांबोडे नाल्याजवळ रमेश पाटील यांच्या शेतासमोरून जानवे गावाकडून येणाऱ्या मोटारसायकल (एमएच १९ डीडी २७१) वरील चालकाने वेगाने व हयगय न करता मोटारसायकल चालवून जोरात धडक दिल्याने आधार पाटील खाली पडले.

त्यांच्या तोंडाला डोक्याला मार लागला. घटनेचे वृत्त कळताच सुभाष भिला पाटील, गोपाळ शांताराम पाटील, भय्या वसंत पाटील, संजय सुभाष पाटील, रवींद्र रमेश पाटील यांनी धाव घेतली. १०८ रुग्णवाहिका मागवली. मात्र, डॉक्टरांनी आधार पाटील याला मृत घोषित केले. त्याचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. दुसरा मोटारसायकलस्वार डांगर येथील असल्याचे समजते, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

अमळनेर पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत. दरम्यान, आधार पाटील यांच्या मोटारसायकलला कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक दिली होती. ते खाली पडलेले असल्याने त्यांच्या मोटरसायकलवर चंदू जाऊन आदळल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरAccidentअपघातDeathमृत्यू