धरणगाव, जि.जळगाव : तालुक्यातील बोरगाव खुर्द व बोरगाव बुद्रूक ही दोन्ही गावे मिळून गेल्या १९ वर्षांपासून ‘दोन गावे : एक दुर्गोत्सव’ साजरा करीत आहेत. यावर्षीदेखील नवरात्रोत्सवनिमित्ताने जय दुर्गा समितीतर्फे हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.बोरगाव बुद्रूक व खुर्द येथे कीर्तनाचा व दांडिया रासचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कीर्तन सप्ताहात २९ रोजी चंद्रकात महाराज आर्थेकर ३० रोजी विश्वनाथ महाराज वाडेकर, १ रोजी जनार्दन महाराज आयावेकर, २ रोजी शुभम महाराज मंदाणेकर, ३ रोजी पथनाट्य, ४ रोजी गोपाळ महाराज सारोरीकर, ५ रोजी दांडिया, ६ रोजी गोविंद महाराज पाचोरेकर, ७ रोजी ज्ञानेश्वर महाराज कंदाणेकर , ८ रोजी दसरा , दांडिया, १० रोजी देवीचा भंडारा होणार आहे.यासाठी सरपंच बोरगाव बुद्रूक व खुर्द, सदस्य, कै.आनंदा सोमा सोनवणे अनुसूचित जाती-जमाती आश्रमशाळा सव शिक्षक मित्र परिवार बोरगाव बु। गणेश मित्र परिवार, जय बंजरग मित्र परिवार ,एकवीरा मित्र मंडळ, जय दुर्गा माता मंडळ, हरी विठठ्ल मित्र, जय दुर्गा रिक्षा स्टाप तसेच सजन आनंदा सोनवणे व विलास सोनवणे हे परिश्रम घेत आहेत.
धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथे ‘दोन गावे : एक दुर्गोत्सव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 5:38 PM
धरणगाव तालुक्यातील बोरगाव खुर्द व बोरगाव बुद्रूक ही दोन्ही गावे मिळून गेल्या १९ वर्षांपासून ‘दोन गावे : एक दुर्गोत्सव’ साजरा करीत आहेत. यावर्षीदेखील नवरात्रोत्सवनिमित्ताने जय दुर्गा समितीतर्फे हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे१९ वर्षांची परंपराविविध उपक्रम राबविण्यात येणार