जळगाव : एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये महावितरणच्या स्टोअर रुमच्या आवारातून विद्युत रोहित्राची केबल चोरणाऱ्या चेतन केशव साळुंखे (३२) व बाळू सैंदाणे (रा.सदगुरु नगर, आयोध्या नगर) या दोघांना सोमवारी सायंकाळी महावितरणच्याच कर्मचाऱ्यांनी पकडले. त्यांना अटक करण्यात आली असून दोघांकडून दीड हजार रुपये किमतीची केबल हस्तगत करण्यात आली आहे.एमआयडीसी जी सेक्टर परिसरात महावितरण कंपनीचे गाळी कक्ष स्टोअरचे कार्यालय आहे. संदीप गजेंद्रसिंग निरंजन हे याठिकाणी सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे. २७ रोजी कर्मचारी निलेश पर्वतकर व पंकज सपकाळे या कर्मचाºयांना कार्यालय परिसरात दोन जण विद्युत रोहित्रास लागणारी केबल चोरून घेवून जात असल्याचे कर्मचाºयांना दिसले. या दोघा कर्मचाºयांनी केबल चोरणाºया दोघांचा पाठलाग केला. या एक जण त्याच्या हातातील केबल सोडून पसार झाला तर चेतन केशव साळुंखे यास पकडण्यात आले. साळुंखे यास सोबत असलेल्याचे नाव विचारले असता बाळू सैंदाणे असे त्याने सांगितले.फरार संशयितासह पोलिसांनी पकडलेयाबाबत महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संदीप निरंजन यांनी हा प्रकार एमआयडीसी पोलिसांना कळविला. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून चेतन साळुंखे यास ताब्यात घेतले. याप्रकरणी संदीप निरंजन यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार बाळू सैंदाणे यास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी,आनंदसिंग पाटील, हेमंत कळसकर, अतुल पाटील, चंद्रकांत पाटील, विजय बावस्कर, सचिन पाटील व मुकेश पाटील यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे.