जळगाव : दुचाकीस्वारांना मागे येणारे वाहन समजण्यासाठी गाडीला आरसा असणे आवश्यक आहे. यामुळे अपघाताच्या घटनानांवरही नियंत्रण मिळविले शक्य होते. मात्र, अनेक दुचाकीस्वारांनी दुचाकीचे आरसे काढुन टाकले आहेत. तर ज्या दुचाकीस्वारांनी आरसे ठेवले आहेत, त्यातील अनेकांनी हे आरसे आपल्या स्वत:चा चेहरा दिसण्यासाठी वळवून ठेवले आहेत. त्यामुळे आरसा हा केवळ केस विंचरण्यापुरताच शिल्लक राहिला असून, वाहतूक पोलिसांकडून मात्र कुुठलीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.
अनेकदा अपघाताच्या घटनांमध्ये दुचाकीस्वारांना मागुन येणाऱ्या वाहनांचा अंदाज किंवा दिशा न समजण्यामुळे अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सुरक्षित वाहतुकीच्या नियमानुसार प्रत्येक दुचाकीला आरसा असणे बंधनकारक आहे. ज्या दुचाकीला आरसा नाही, अशा दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाईच्या सुचनादेखील करण्यात आल्या आहेत. मात्र, अशा प्रकारची कुठलीही कारवाई आरटीओ विभाग व शहर वाहतूक पोलिसांतर्फे केली जात नसल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांनी आरसे काढुन टाकले आहेत. आरशा अभावी अपघाताच्या घटना घडण्याचे प्रकार घडत असतानांही, ना दुचाकीस्वारांना ना पोलिसांना काळजी असल्याचे दिसून येत आहे.
इन्फो :
शहरातील दुचाकी १ लाख ५० हजार
आरसा नाही म्हणून ५०० रूपये दंड :
इन्फो :
दुचाकीस्वारांना हे बंधनकारक :
दुचाकी स्वारांना सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीकोनातून नेहमी जवळ लायसन्स, प्रदूषण मुक्त सर्टिफीकेट, गाडीचे कागदपत्रे, हेल्मेट व गाडीचा विमा आदी कागदपत्रे प्रवासात सोबत असणे बंधनकारक आहे.
इन्फो :
सुरक्षित वाहतुकीसाठी दुचाकीला आरसा ठेवणे, हे बंधनकारक आहे. यामुळे अपघाताच्या घटनांना आळा बसतो. आरटीओ विभागातर्फे आरसा नसणाऱ्या व तुटलेला आरसा ठेवणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई सुरूच असते. मात्र, आता ही मोहिम अधिक कडक करण्यात येणार असून, दुचाकीला आरसा न ठेवणाऱ्यांवर २०० रूपये दंडाची कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
किरण मोरे, सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी.