शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
2
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
3
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
4
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काका विरुद्ध पुतणी! गायत्री शिंगणे घड्याळ हातात बांधणार? अजित पवारांची घेतली भेट
6
कोण म्हणतं भाईजान घाबरला? बिश्नोईच्या धमक्यांदरम्यानच दिसणार सलमान खानचा 'चुलबुल पांडे' अवतार
7
भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
9
'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."
10
"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल
11
बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!
12
Defence stocks मध्ये मोठी विक्री, Mazagon Dock, GRSE जोरदार आपटले
13
अब्दुलांची भाजपाशी जवळीक वाढली, काश्मीरच्या विधानसभेत दिलं मोठं पद 
14
VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी
15
भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
17
IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटीसाठी भारताची रणनीती ठरली? एक महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता
18
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
19
MVA Seat Sharing: उद्धव ठाकरे-बाळासाहेब थोरातांमध्ये अडीच तास काय झाली चर्चा?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"५ कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचवले", रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

दुचाकी चोरट्याला चोपड्यातून ठोकल्या बेड्या ! तीन दुचाकी हस्तगत ; एलसीबीची कारवाई

By सागर दुबे | Published: April 03, 2023 8:27 PM

पुढील कार्यवाहीसाठी त्याला जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जळगाव: जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला चोपडा येथून बेड्या ठोकल्या असून त्याच्याजवळून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढील कार्यवाहीसाठी त्याला जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चोपडा तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे चोरट्यांचा शोध घेवून त्यांचा अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून दुचाकी चोरट्यांचा शोध सुरू होता. दीपक बारेला नामक व्यक्ती हा विना क्रमांकाची दुचाकी घेवून चोपडा शहरात फिरत असल्याची माहिती सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

चोपड्यातील कारगिल चौकात पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने पथकाला जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथील तीन दुचाकी काढून दिल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, अश्रफ शेख, दीपक पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन, हेमंत पाटील, प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी