जळगाव : ओव्हरटेक करण्याच्या प्रय}ात भरधाव वेगाने जाणा:या विद्याथ्र्याची दुचाकी कारवर आदळली. त्यात एका बाजुने कार तर दुस:या बाजुने एस.टी.बस या दोघांच्यामध्यभागी दुचाकी आली, कारचालकाच्या प्रसगांवधानाने दुचाकीस्वार बालंबाल बचावले. मनाची धडकी वाढविणारा हा अपघात सोमवारी दुपारी दोन वाजता शिरसोली रस्त्यावरील डी.मार्टपासून जवळच असलेल्या गुंजन मंगल कार्यालयाजवळ झाला.सामनेर,ता.पाचोरा येथील कार (क्र.एम.एच.19 बी.जे.6279) जळगाव शहरात येत असताना मागून रायसोनी अभियांत्रिकीचे दोन विद्यार्थी अतिशय महागडय़ा व विना क्रमांकाच्या दुचाकीने (स्पोर्टस बाईक) भरधाव वेगाने येत होते. समोरुन एस.टी.बस येत असतानाही दुचाकीस्वाराने कारला कट मारुन ओव्हरटेक करण्याचा प्रय} केला. त्यात दुचाकी कारवर घासली गेली व त्यातच दोघंही दुचाकीसह कोसळले. कार व बस या दोन्ही वाहनांचे टायर या दोघांपासून अवघ्या एक फुटावर होते. हा प्रसंग पाहून सर्वच वाहनधारकांचा थरकाप उडाला. कार चालक विजय साळुंखे यांनी प्रसंगावधान राखून कारवर नियंत्रण मिळविले. या अपघातात कार व दुचाकी यांचे नुकसान झाले असून दुचाकीस्वार तरुणही जखमी झाला आहे. फायनान्स कंपनीतील वसुली अधिका:याचा तो मुलगा आहे. पोलिसात तक्रार न करण्याची विनंती तो विद्यार्थी करत होता. शेवटी नातेवाईक व मित्रांच्या मध्यस्थीने वाद मिटला. कार चालक साळुंखे हे रेल्वे स्थानकावर भावाला घेण्यासाठी सामनेर येथून आले होते.
कार चालकाच्या प्रसगांवधानाने बालंबाल बचावले दुचाकीस्वार
By admin | Published: February 07, 2017 1:27 AM