जळगाव : जुन्या खेडी रोड येथील प्रेमचंद नगरातून गोपाळ सीताराम पाटील यांच्या मालकीची ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र. एम. एच.१९ सी.एम.२७६७) ५ एप्रिल रोजी रात्री चोरी झाली आहे. याप्रकरणी शनिवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अजय पाटील करीत आहे.
विद्यार्थ्याचा मोबाईल लांबवला
जळगाव : मू. जे. महाविद्यालयाच्या पार्किंगमधून विशाल सुरेश तायडे (वय १८, रामेश्वर काॅलनी) या विद्यार्थ्याचा ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल व ५ हजार रुपये रोख लांबवण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शिवाजी धुमाळ करीत आहे.
अपघातप्रकरणी गुन्हा दाखल
जळगाव : समतानगरातील स्वराज चौकात रिक्षाचे ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात युवराज ऊर्फ भगवान गोविंदा बाविस्कर (रा. कोळंबा, ता. चोपडा) यांचा मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी घडली होती. याप्रकरणी स्वत:च्या मरणास कारणीभूत ठरले म्हणून युवराज ऊर्फ भगवान गोविंदा बाविस्कर यांच्याविरुद्ध शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.
पानटपरीला आगप्रकरणी गुन्हा
जळगाव : शिवाजीनगरातील क्रांती चौकात आदिनाथ विश्वनाथ दारकुंडे यांच्या मालकीच्या पान टपरीला शुक्रवारी आग लागली होती. यात सिगारेट, तंबाखू, चिल्लर आदींसह किरकोळ साहित्य असे २५ हजार ३९० रुपयांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी शनिवारी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. तपास ओमप्रकाश सोनी करीत आहेत.
अनोळखी पुरुषाचा मृत्यू
जळगाव : जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ६० वर्षीय अनोळखी पुरुषाचा शुक्रवारी मृत्यू झाला. याप्रकरणी शनिवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार प्रमोद पाटील करीत आहेत.