पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना जळगाव जिल्ह्यातील घरफोडी, चोरी, मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार अशोक महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र गायकवाड, संदीप पाटील, सूरज पाटील, प्रदीप पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन, रावसाहेब पाटील यांचे पथक रवाना केले होते.
रमेश शाहदा पावरा (जाधव) (जिरायतपाडा, ता. चोपडा) यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे दुचाकी मिळून आली. अधिक चौकशी करता त्याने ती दुचाकी चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केली असल्याची कबुली दिली. त्याला अधिक तपास कामी चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.