ठाणे/जळगाव : दोन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करून तिस:यांदा पोलीस अधिका:याच्या मुलीसोबत बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या पाल,ता.रावेर येथील नीरज सुरेश सूर्यवंशी (वय 29) या डॉक्टर कुटुंबातील युवकास ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. नीरजला सोबत घेवून त्याच्या कुटूंबाच्या शोधासाठी ठाणे येथील सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांचे एक पथक सोमवारी जिल्ह्यात दाखल झाले. जळगाव, भुसावळ व पाल येथे त्यांचा शोध घेण्यात आला, मात्र रात्री उशिरार्पयत त्यांचा तपास लागला नाही.निरज हा बी.फार्मसीचे शिक्षण घेत असून, त्याचे वडिल आणि भाऊ दोघेही डॉक्टर आहेत. त्याने 2013 साली नाशिक येथील एका मुलीशी विवाह केला होता. तिच्यापासून त्याला अपत्यही झाले आहे. तिला सोडल्यानंतर घटस्फोटाची बनावट कागदपत्रे त्याने तयार केली. तत्पूर्वी त्याचा आणखी एक विवाह झाला होता. दरम्यान, ठाण्यातील एक पोलीस अधिकारी मुलीसाठी वर शोधत असताना त्यांना या स्थळाची माहिती मिळाली. ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांनी मुलीचा साखरपुडा निरजसोबत केला. लग्नाची तारीख 18 जानेवारी 2017 ठरली होती. परंतु दरम्यानच्या काळात निरजच्या कुटुंबियांनी मुलीच्या पालकांशी संपर्क साधून मुंबईत फ्लॅट देण्याची मागणी केली. विवाह मोडण्याची दिली धमकीआपण स्वत:च कर्ज करुन फ्लॅट विकत घेतला असताना जावयाला फ्लॅट कुठून द्यायचा असा प्रश्न या पोलीस अधिका:याच्या कुटुंबास पडला. त्यांनी फ्लॅट देण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर निरजच्या कुटुंबियांनी विवाह मोडण्याची धमकी दिली. एवढेच काय, साखरपुडय़ाची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकीही त्यांनी दिली. या प्रकारामुळे त्रासलेल्या या पोलीस अधिका:याने निरजची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. त्याने मध्यप्रदेशातील आणखी एका मुलीला अशाच प्रकारे फसविण्याच्या प्रयत्न केला. तीन आठवडय़ांपूर्वी या पोलीस अधिका:याने ठाण्यातील कोपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. नाशिकची प}ी न्यायालयात पोहचली4गुन्हा दाखल झाल्यानंतर निरजने ठाण्याच्या न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांच्या जामिनास विरोध केला. भरिस भर निरजने सोडलेली नाशिक येथील पत्नी न्यायालयात हजर झाल्याने सरकारच्या पक्षाची बाजू बळकट झाली. न्यायालयाने निरजचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.आरोपीला 25 जानेवारीर्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दोन बायकांचा दादला गजाआड
By admin | Published: January 24, 2017 1:36 AM