भुसावळ : महामार्गावरील जय जवान पेट्रोल पंपाजवळ दुचाकी व ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने जैन इरिगेशनचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना झाली.मिलिंद भारंबे (४२), राजेंद्र पाटील (४३) राहणार महेश नगर नाहाटा कॉलेज जवळ हे दोघे जैन इरिगेशनचे कर्मचारी दुचाकी आपल्या दुचाकी क्रमांक एमएच-१९-एटी-८०६४ यावरून जैन इरिगेशन कंपनीत कामाला जात होते. त्याच वेळेस जळगाव करून भुसावळकडे ट्रक क्रमांक जीजे-१२-झेड -०६५२ याने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघी कर्मचारी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच साकेगाव ग्रामस्थ व पंपावरील कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली दोन्ही गंभीर जखमींना उपचारार्थ खासगी रुग्णालयात हलविले. दरम्यान ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.हेल्मेट मुळे वाचले दोघांचे प्राणदोन्ही कर्मचारी नेहमीप्रमाणे जळगाव येथील जैन इरिगेशन कंपनीत दुचाकीवरुन जात असताना नेहमीच्या सवयी प्रमाणे हेल्मेट घालून जात होते. ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे हेल्मेटला तडे गेले आहेत. जर हेल्मेट नसते तर दोघांना प्राणही गमवावे लागले असते अशी उभयतांमध्ये चर्चा होती.
साकेगाव जवळ दुचाकीच्या अपघात दोन कर्मचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 3:40 PM