भुसावळ, जि.जळगाव : येथील खडका रोड भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूची लागण झाली असून, दोन तरुणांना डेंग्यूच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.खडका रोड भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, या भागातील जुनी बी.झेड.उर्दू हायस्कूलजवळील एका १९ वर्षीय तरुणास डेंग्यूची लागण झाली असून, उपचारासाठी जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.याशिवाय दुसऱ्या ३० वर्षीय तरुणालाही डेंग्यूची लागण झाली आहे. त्याच्यावर भुसावळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या परिसरात डेंग्यूची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.गेल्या पंधरवड्यात सिंधी कॉलनी येथे ही डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले होते. पालिका प्रशासनाने तत्काळ दखल घेत सिंधी कॉलनीचा चप्पा चप्पा पिंजून काढत कंटेनर सर्वेक्षण केले होते व डेंग्यूची साथ आटोक्यात आणली होती. हीच अपेक्षा खडका रोड भागातील रहिवाशांची आहे. येथेही गल्लोगल्ली कंटेनर सर्वेक्षण करून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी व उपाययोजना करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.शहरात सर्वत्र कंटेनर सर्वेक्षण सुरू आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय’ दिवस पाळावा. खडका रोड परिसरात संपूर्ण आरोग्याची टीम जाऊन कंटेनर सर्वेक्षण करण्यात येईल.-डॉ.कीर्ती फलटणकर,वैद्यकीय अधिकारी, नगरपालिका, भुसावळ
भुसावळात दोन तरुणांना डेंग्यूची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 12:24 AM
भुसावळ येथील खडका रोड भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूची लागण झाली असून, दोन तरुणांना डेंग्यूच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठळक मुद्देभुसावळ शहरातील खडका परिसरात साथीचे आजाराचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घ्यावा व उपाययोजना करावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.