आॅनलाईन लोकमतयावल, दि.२२ : तालुक्यातील अट्रावल येथे सुरु असलेल्या मुंजोबा यात्रेत आकाश पाळण्यात सेल्फी काढताना योगेश सोपान भारंबे (वय-२०) व शेखर वसंत तेली (वय २४, दोघे रा.चितोडा, ता.यावल) हे सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खाली पडून गंभीर जखमी झाले.यावल तालुक्यातील अट्रावल येथे प्रत्येक वर्षी मुंजोबाच्या यात्रेचे आयोजन केले जाते. याठिकाणी जिल्हाभरातील भाविकांची उपस्थिती राहत असल्याने यात्रेत पाळणे तसेच जादूचे खेळासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोमवारी याठिकाणी लावलेल्या आकाश पाळण्यात योगेश सोपान भारंबे व शेखर वसंत तेली हे दोघे जण बसले. पाळण्यात बसल्यानंतर दोघांनी सेल्फी काढण्यासाठी मोबाईल काढला. या दरम्यान दोघांचा तोल गेल्याने ते खाली कोसळले. यात योगेश याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. तर शेखर याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. दोघांना उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.दरम्यान, पाळणा चालकांनी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली नसल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. पाळण्यात सुरक्षेसाठी चैनगार्ड लावलेली नसल्याचे यात्रेकरूंचे म्हणणे आहे.
यात्रेत सेल्फी काढताना पाळण्यातून पडून दोन तरुण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 4:02 PM
यावल तालुक्यातील अट्रावल येथील यात्रेतील घटना
ठळक मुद्देयावल तालुक्यातील अट्रावल येथे दरवर्षी यात्रेचे आयोजनसेल्फी काढत असताना दोघांचा तोल गेल्याने गंभीर जखमीग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर दोघांना जळगावला हलविले