- विलास बारीलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात यंदा उद्धवसेनेने पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पाटील (पवार) यांना उमेदवारी देत लढत रंगतदार केली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासमोरील आव्हान यावेळी मोठे असणार आहे. भाजपने माजी खासदार उन्मेष पाटील यांचे तिकिट कापल्यानंतर, त्यांनी करण पाटील (पवार) यांच्यासह उद्धवसेनेत प्रवेश केला.
या मतदारसंघात जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल या तीन विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे आमदार आहेत. अमळनेर मतदार संघात अजित पवार गटाचे आमदार आहेत. तर चाळीसगाव व जळगाव शहर मध्ये भाजपचे आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून बंडखोर उभे करण्यात आल्याने सर्वाधिक त्रास हा शिंदेसेनेच्या आमदारांना झाला होता. याबाबतची खदखद महायुतीच्या मेळाव्यात या आमदारांनी जाहीरपणे बोलूनदेखील दाखविली आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या मदतीवर भाजपच्या विजयाचे गणित असणार आहे.
उद्धवसेनेची मदार कार्यकर्त्यांवर तर भाजपची नेत्यांवरमहायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिंदेसेनेकडे बहुतांश आमदार आहेत. सध्या उद्धवसेनेकडे आमदार नसले तरी कार्यकर्त्यांचे संघटन चांगले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उद्धवसेनेची सर्व मदार ही कार्यकर्त्यांवर आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर मात्र बहुतांश नेते हे शरद पवार गटात थांबून आहेत. त्या तुलनेत महायुतीकडे नेते व कार्यकर्ते यांचे चांगले संघटन आहे. या मतदारसंघातील सर्वच तालुक्यात भाजप, शिंदे सेनेचे आमदार आहेत. भाजपचे कार्यकर्त्यांचे संघटनदेखील चांगले आहे. त्यामुळे या मतदार संघात जोरदार लढत होण्याचे संकेत आहेत.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
भाजपकडून अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना, ३७० कलम, देशाची अंतर्गत व बाह्यसुरक्षा, शेतकऱ्यांना मिळणारा ६ हजार रुपयांचा सन्मान निधी, सात बलून बंधारे निर्मितीचे आश्वासन, निम्न तापी प्रकल्प हे मुद्दे हाताळण्यात येत आहेत.उद्धवसेनेकडून जिल्ह्यासह देशातील रोजगाराच्या समस्या, शेतकऱ्यांच्या धान्याला मिळत नसलेला हमीभाव, निम्न तापी प्रकल्प, केळी पीकविम्याची रखडलेली नुकसानभरपाई या मुद्द्यांवर भर दिला जात आहे.
जळगाव शहर व ग्रामीण ठरणार निर्णायक nजळगाव तालुक्यात सर्वाधिक मतदार आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या दृष्टीने जळगाव शहर व ग्रामीण मतदार संघ महत्वाचा असणार आहे. nचाळीसगाव तालुक्यात उद्धवसेनेचे नेते व माजी खासदार उन्मेष पाटील व भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला आहे.
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते २०१४ एम.के.पाटील भाजप २,९७,८६७ २००४ एम.के.पाटील भाजप २,८९,५५९ २००७ ॲड.वसंत मोरे राष्ट्रवादी २,४१,७०७ २००९ ए.टी.पाटील भाजप ३,४३,६४७ २०१४ ए.टी.पाटील भाजप ६,४७,७७३