जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खान्देशातील पाचोºयापासून फुंकणार असून १५ फेब्रुवारी रोजी ते पाचोरा येथे सभा घेणार आहेत. जळगाव लोकसभा मतदार संघावर या माध्यमातून शिवसेना आपला दावा बळकट करण्याची चिन्हे आहेत.लोकसभा निवडणुकीची राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. राज्यात या पार्श्वभूमीवर दावे-प्रतिदावे सुरू आहेत. युती होणार की नाही याच्या चर्चा रंगत असतानाच शिवसेनेने या निवडणुकीच्या खान्देशातील प्रचाराचा बिगुल फुंकण्याची तयारी सुरू केली आहे.जळगाव मतदार संघावर दावाराज्यात पूर्वी युती असताना जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा या भाजपाकडे असत. त्यामुळे यावेळीही पक्षाकडून दोन्ही जागांसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. दुसरीकडे शिवसेनेकडूनही तयारी सुरू आहे. यातही एक पाऊल पुढे टाकत थेट प्रचाराचा शुभारंभ या पक्षाने सुरू केला आहे. युती झाली तरी किंवा न झाली तरी लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदार संघाची जागा शिवसेनेला मिळावी असे प्रयत्न या पक्षातील स्थानिक नेत्यांकडून सुरू आहेत. माजी आमदार, पक्षाचे सहसंपर्क प्रमुख आर. ओ. पाटील हे या जागेसाठी दावेदार असल्याचे सांगितले जात आहे.जिल्ह्यात होणार शक्तीप्रदर्शनलोकसभा निवडणुकीत युतीची तयारी सुरू असली तरी जिल्ह्यात शक्तीप्रदर्शनाची तयारी शिवसेनेकडून सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या १५ फेब्रुवारी रोजी पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत पक्षाचे जिल्ह्यातील शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू झाली आहे.मुख्यमंत्र्यांनी घेतला दोन्ही लोकसभा मतदार संघांचा आढावाभाजपची उत्तर महाराष्ट्राची लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठक बुधवार, ३० जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर पार पडली. त्यात लोकसभा मतदार संघांचा संघटनात्मक व राजकीयदृष्ट्या आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे, खासदार ए.टी.पाटील, खासदार रक्षा खडसे, जिल्ह्यातील सर्व आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने बुथरचना, मतदान केंद्र निहाय बुथप्रमुख नेमणूक, मतदार संघात प्रमुख विरोधी पक्ष कोणता? त्यांचे संभाव्य उमेदवार कोण असतील? याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाणून घेतली. शिवसेनेचा उमेदवार असेल तर तेथे कोण उमेदवार असेल? याचीही माहिती घेतली. तसेच लोकसभा मतदार संघांमध्ये येणाºया विधानसभा मतदारसंघांची स्थितीही जाणून घेतली. मात्र युतीबाबत प्रदेशाध्यक्ष तसेच वरिष्ठस्तरावरच निर्णय होणार असल्याने त्याबाबत तसेच भाजपाच्याच संभाव्य उमेदवारांबाबतही काहीही चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी संघटनमंत्री विजय पुराणिक, माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी,विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय सावकारे, जि.प.उपाध्यक्ष तथा लोकसभा संयोजक नंदु महाजन, सुनिल नेवे, सुरेश धनके, हर्षल पाटील, आत्माराम म्हाडके, माधवराव गावंडे,अजय भोळे उपस्थित होते.दोन्ही खासदारांकडूनही घेतला आढावामुख्यमंत्र्यांनी यावेळी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान खासदारांकडून त्यांच्या मतदार संघांचा तालुकानिहाय आढावा असलेला अहवालही घेतला.जळगाव मतदार संघावर शिवसेनेचा दावा असेल. युती झाली तरी किंवा न झाली तरी आम्ही उमेदवार देऊ. म्हणूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जिल्ह्यात येत आहेत. खान्देशातील प्रचाराचा नारळ या ठिकाणी वाढविला जाईल.- गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख.जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा हा दौरा आहे. याच दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबतही ते बोलतील.- गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्रीमाजी मंत्री उत्तमराव पाटील यांच्यापासून या मतदार संघातून भाजपा निवडणूक लढवत आहे. पक्षाचा परंपरागत हा मतदार संघ असून तसे यशही प्रत्येक निवडणुकीत मिळाले आहे. त्यामुळे या मतदार संघातून भाजपाच निवडणूक लढवेल. -उदय वाघ, जिल्हाध्यक्ष भाजपा.
लोकसभा निवडणुकीचा नारळ उद्धव ठाकरे वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:29 PM
१५ रोजी पाचोऱ्यात सभा
ठळक मुद्दे जळगाव लोकसभा मतदार संघावर दावा