मातृभाषेत जे ज्ञानाचे आकलन होते, ते परकीय भाषेतून होत नाही. त्यासाठी शालेय शिक्षण हे मातृभाषेतच घेतले जावे, असे स्पष्ट मत राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते.मातृभाषेतून शिक्षण असणं आणि ती समजणं या दोन्ही बाबी भिन्न आहेत. मातृभाषा ही सोपी असते, ती लवकर समजते. गुंतागुंत किंवा प्रश्न निर्माण होत नाही. परकीय भाषेत मात्र या अडचणी निर्माण होतात. त्यासाठी शालेय शिक्षण मराठीत असणं आवश्यक आहे. शेक्सपियर काय म्हणतात, हे इंग्रजी पुस्तकातून समजते. इंग्रजीतल्या अनेक कविता पाठ असतात. सहज बोलता व वाचता येतात, मात्र त्याचा अर्थ अवगत नाही.मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या निकमांचे नाव देशपातळीवरमराठी भाषा अवगत असणं, प्राथमिक शिक्षण घेणं याचा अर्थ असा नाही की इंग्रजीत शिक्षण घेऊ नये किंवा स्वीकारु नये. जगात वावरताना इंग्रजी भाषेचेही तितकेच महत्व आहे. ज्ञानात वाढ होण्यासाठी मातृभाषाच महत्वाची आहे. अॅड.निकम यांचे प्राथमिक शिक्षण मराठीतच झाले असून पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण आर.आर.विद्यालयात तर आठवी ते दहावी ला.ना.विद्यालयात झालेले आहे. मराठी या मातृभाषेत शिक्षण घेतलेले व जळगावचे सुपुत्र अॅड.निकम यांचे नाव देश व विदेश पातळीवर पोहचलेले आहे.(शब्दांकन - सुनील पाटील)
राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणतात... ‘मातृभाषेतच होते ज्ञानाचे परिपूर्ण आकलन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 1:17 AM