त्यू हे या विश्वातील एकमेव शाश्वत सत्य आहे, मात्र ते अपवित्र नाही. आपण आपल्या आयुष्यात अशाश्वत गोष्टींवर चर्चा करीत बसतो, मात्र मृत्यूसारख्या विषयावर खुलेपणाने चर्चा करायलादेखील घाबरत असतो. मृत्यूसारख्या विषयावर आपण चर्चा करणे आपल्याकडे अपशकून किंवा गुन्हा मानला जातो. आपण विषय जरी केला तरी किंवा मिश्कीलपणे जरी या विषयावर बोललो तर ‘भरल्या घरात काय हे असं अभद्र बोलणं’ म्हणून या विषयावर बोलणे टाळतो. वास्तविकत: अंत्यसंस्कार हा आपल्या आयुष्याचा सर्वात सर्वश्रेष्ठ संस्कार व्हायला पाहिजे, पण आपण तो होऊ देत नाही. मृत्यूनंतर प्रत्येक धर्मात वेगवेगळे क्रियाकर्म असतात. मृत्यू हा एक लॉस असतो हे 100 टक्के खरे आहे. पण हा लॉस केवळ एका व्यक्तीचा नसतो. हा लॉस नातेसंबंधांचा असतो. हे नातेसंबंध वेगवेगळे असतात. हा लॉस कसा भरून काढायचा यासाठी प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या सोयी किंवा चालीरीती आहेत. हा लॉस अपेक्षित असेल तरी त्याचं दु:ख असतं. परंतु लॉस अनपेक्षित असेल तर त्याचं दु:ख, वेदना, पीडा जास्त असते. मृत्यूची वास्तवता स्वीकारण्यासाठी काही प्रकारची क्रियाकर्म असतात. यामध्ये दु:खाला वाचा फोडली जाते. 10 लोक एकत्र येतात, त्यातून मृत्यूच्या झळांची वेदना कमी करण्याचा प्रय} असतो. मृत्यू झाल्यानंतर मनात दाटून आलेल्या भावना व्यक्त करणं म्हणून क्रियाकर्मात रडण्याची तरतूद आहे. नातेवाईक यावेळी त्या व्यक्तीच्या कटू-गोड आठवणींना उजाळा देतात. व्यक्ती गेल्यानंतर त्याच्याबद्दलची कटूता संपते आणि म्हणून आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे की, गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये. व्यक्ती कोणतीही असो, ती व्यक्ती गेली की घरातला समतोल बिघडतो. असं म्हणतात की, जेव्हा आपण एखादा अंत्यविधी अटेन्ड करतो तेव्हा आपल्या मृत्यूची रिहर्सल करीत असतो. तुमची स्वत:च्या मृत्यूची रिहर्सल आपण कळत-नकळत करीत असतो. मृत्यू ही दु:खदायक बाब आहे हे नक्की. आपल्याजवळील व्यक्ती आठवडा-महिना जरी कुठे बाहेरगावी गेली तरी आपल्याला अस्वस्थ वाटते. मग मृत्यू झाल्यावर तर काय भावना होते हे वेगळे सांगायला नको. मला एका गोष्टीचं अप्रूप किंवा आश्चर्य वाटतं की, आपल्यापैकी ब:याच लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. मृत्यू झाल्यावर आपण एका योनीतून दुस:या योनीत प्रवेश करतो असे म्हटले जाते. आपल्याला मोक्ष मिळालेला असतो. तर मग आपण पुनर्जन्म घेण्यासाठी आपण तर आनंदी असले पाहिजे ना? पण आपण मात्र दुखी असतो. आपण शाळेचं शिक्षण घेऊन कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी जातो. तेव्हा आपण दु:ख व्यक्त करतो की, आनंद व्यक्त करतो? तर मृत्यूनंतर आपण एका जन्मातून दुस:या जन्माला जात असतो ना? मग अशावेळीसुद्धा आपण दु:खी व्हायला नको. म्हणून हा विचार अपवित्र का मानायचा हे मला समजत नाही. म्हणून मृत्यू हा दु:खद जरी असला तरी तो अपवित्र मानण्याचं कारण नाही. स्व.सुंदरलाल मल्हारा यांचं उदाहरण मला द्यायला आवडेल. आपल्या मृत्यूनंतर माङया मृतदेहाचं काय करायचं अशी योजना त्यांनी अगोदरच आपल्या मुलांना व नातेवाईकांना देऊन ठेवली होती. त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी त्यांचं देहदान केलं. असंच एक उदाहरण माङया नातेवाईकाचं आहे. एक वयोवृद्ध महिलेने मृत्यूपूर्वी इच्छा व्यक्त केली होती की माङया मृत्यूनंतर माङो शरीर विद्युत दाहिनीत जाळायचं आणि घरी आल्यानंतर कुणीही शोक-दु:ख व्यक्त करीत बसायचं नाही. माझा फोटो लावायचा नाही. दुस:या दिवसानंतर आपापल्या कामांना लागायचं, हे असं सारं त्या माङया नातेवायिकाने मृत्यूपूर्वी लिहून ठेवले होते. असं आपणही लिहून ठेवलेलं असलं पाहिजे. लिहून ठेवलेलं नसलं की मग प्रॉब्लेम होतो. एक नातेवाईक म्हणतो की, मला असं सांगितलेलं होतं, तर दुसरा म्हणतो की मला तर काहीच सांगितलेलं नव्हतं आणि मग वाद सुरू होतात म्हणून लिहून ठेवणे केव्हाही चांगले. एक नुकताच घडून गेलेला प्रसंग आहे. माङया परिचयाचे एक बुजुर्ग व्यक्ती काही दिवसांपूर्वीच वारले. तेव्हा त्यांच्या प}ीची त्या व्यक्तीचे देहदान करण्याची इच्छा होती. परंतु त्यांचा बाहेरगावी राहणारा मुलगा विरोध करू लागला. म्हणाला, ‘माङया वडिलांचे देहदान करायचे नाही. त्यांच्यावर अंतिम संस्कार करायचे.’ एक व्यक्ती अंतिम संस्काराच्या विधीसाठी डिङोल आणायला गेला होता. तो डिङोल घेऊन आल्यावर त्या मृत व्यक्तीचा मुलगा म्हणाला, ‘माङया वडिलांना डिङोलने नाही साजूक तुपात जाळायचे.’ त्याच्या या प्रतिक्रियेवर हसावं की रडावं तेच कळेना. आयुष्यभर त्या मुलीने आई-वडिलांचा सांभाळ केला नाही आणि आता वडिलांचं अंतिम संस्कार त्याला साजूक तुपात करावयाचा आहे. मृत्यूनंतर हे वाद व्हायला नको म्हणून मृत्यूपूर्वीच जसं आपण आर्थिक नियोजन करून ठेवतो तसंच या गोष्टींचेही नियोजन आपण करून ठेवायला पाहिजे. आयुष्यातल्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात. जन्म, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय, लग्न, संसार, निवृत्ती आणि मृत्यू. यातील प्रत्येक स्टेजचे आपण नियोजन करून ठेवतो. गंमत अशी आहे की, यातील कोणत्याच स्टेजची शाश्वती देता येत नाही. आपल्याला हवे असलेले शिक्षण आपल्याला मिळेलच याची शाश्वती नाही, मनातील छबीप्रमाणे वधू किंवा वर आपल्याला मिळेलच असं नाही. आपल्याला आवडणारी नोकरी आपल्याला मिळेलच असे नाही. परंतु एका गोष्टीची शाश्वती आपण देऊ शकतो ती गोष्ट म्हणजे मृत्यू. शेवटी कवी गोविंद यांची मृत्यू या विषयावर त्यांनी आपल्या शेवटच्या दिवसात लिहिलेली एक कविता आहे ती सांगतो, ‘सुंदर मी होणार आता सुंदर मी होणार, जुनी इंद्रिये, जुना पसारा आता मी त्यागणार हो, नव्या तनुचे नवे पंख आता मला फुटणार हो, सुंदर मी होणार आता सुंदर मी होणार.’
मृत्यू हे अंतिम सत्य, मात्र ते अपवित्र नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 5:11 PM