जळगाव : जिल्हाभरातील पायाभूत सर्व्हेक्षणातून सुटलेल्या वाढीव कुटुंबांच्या शौचालय बांधकामांचे उदीष्ट ६ डिसेंबरपर्यंत पूर्ण न झाल्यास थेट कारवाई करेल, असा इशारा प्रभारी सीईओ वान्मथी सी यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे़ ३१ डिसेंबर नंतर अनुदान मिळणार नसल्याने टार्गेट पूर्ण करण्याचे सर्व गटविकास अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे़शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये प्रधान सचिवांनी जिल्ह्याच्या स्थानिक कामगिरीवर नाराजी व्यक्त करत सर्व गटविकास अधिकाºयांची झपाई केली़ जळगावात संथ गतीने काम सुरू असून जिल्हा रेड झोनमध्ये असल्याचे त्यांनी सांगत यंत्रणेला खडसावल्याची माहिती आहे़ दरम्यान, यावरून आपण जो पर्यंत आहे तो पर्यंत कामे पूर्ण न झाल्यास थेट निलंबित करेल, अशा शब्दात सीईओ वान्मथी सी यांनी गटविकास अधिकाºयांना तंबी दिली आहे़पायाभुत सर्व्हेक्षणातून सुटलेल्या कुटुंबासाठी शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट देण्यात आले होते़ यानुसार जिल्हाभरात एकूण ५६ हजार ४४८ शौचालये बांधायची होती़ त्यापैकी ४२ हजार ५२ शौचालयांचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. उर्वरीत १४ हजार ३९६ शौचालयांची उभारणी आगामी पंधरा दिवसांच्या आत करायची आहे़प्रतिदिवस ४६४ शौचालये व्हावीतजिल्ह्यात चाळीसगाव ४६५८, अमळनेर २८६२, जामनेर १५२२, भडगाव १४९५ , पारोळ १३३०, भुसावळ १२६०, या तालुक्यांमध्ये अधिक कामे बाकी आहे़त़ उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रतिदिवस ४६४ शौचालयांची उभारणी होणे गरजेचे आहे़ यात धरणगाव, रावेर, पाचोरा, एरंडोल या तालुक्याची उद्दीष्टे पूर्ण झालेली आहेत़३१ डिसेंबरनंतर अनुदान बंद... शौचालय बांधकामांसाठी ३१ डिसेंबर नंतर अनुदान मिळणार नसून जे काही काम करायचे आहे ते या एका महिन्यातच पूर्ण करा, अशा सक्त सूचना मंत्रालय स्तरावरून आलेल्या आहेत़ त्यामुळे कामात प्रगती दाखवाच, हलगर्जीपणा करू नका, हलगर्जी पणा केल्यास किंवा कामात प्रगती न दिसल्यास स्थानिक गट समन्वयकांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा सीईओंनी दिला आहे़ दरम्यान, काही गटविकास अधिकाºयांना नोटीस बजावण्याचे आदेशही देण्यात आले आहे़उद्दीष्टपुर्तीसाठी आम्ही पूर्ण नियोजन केलेले आहे़ स्थानिक पातळीवर काही बदल्याही केलेल्या आहेत़ ज्या ठिकाणी अधिक टार्गेट आहे त्या ठिकाणी अधिक कर्मचारी आम्ही दिलेले आहेत़ -डी़ आऱ लोखंडे, डेप्युटी, सीईओ पाणी व स्वच्छता
शौचालय उद्दीष्टांसाठी अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 12:45 AM