जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेच्या तिसºया दिवशी गुरुवारी सायंकाळी यजमान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुरुष संघाने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३-१ ने पराभव केला. त्याचसोबत उमविच्या संघाने जोधपूरच्या विद्यापीठावर ३-२ विजय मिळवत मुख्य पात्रता फेरीत प्रवेश केला आहे. उमविच्या संघाने तिन्ही एकेरी सामन्यात दमदार विजय मिळवला, तर दुहेरीत चुरशीच्या सामन्यात उमविला राहुरी कृषी विद्यापीठाकडून पराभव पत्करावा लागला. पहिल्या एकेरीत प्रणव पाटील याने राहुरीच्या अक्षय साहसे याला २१-१०, २१-५ असे पराभूत केले. तर दिलीप शिरसाठ याने लोकेश जगताप याला २१-१२, २१-५ असे पराभूत केले. दुहेरीत दीपेश पाटील आणि गोपाल पाटील या जोडीने अक्षय साहसे आणि भूषण तिवाथने यांनी चुरशीच्या सामन्यात २१-१२, १६-२१, २६-२८ असा पराभव पत्करला. पहिल्या गेममध्ये उमविच्या संघाने आघाडी घेतली. मात्र त्यानंतर राहुरीच्या खेळाडूंनी आघाडी घेत दुसरा गेम जिंकला. निर्णायक गेममध्ये दोन्ही संघाच्या खेळाडूंची दमछाक झाली. एक वेळ आघाडीवर असणाºया उमविच्या संघाला अखेरचे गुण मिळवता आले नाही. २१-२० अशा स्थितीतून राहुरीच्या खेळाडूंनी २८-२६ असा गेम संपवत विजय मिळवला.तिसºया लढतीत शुभम पाटील याने भूषण तिवाथने याला २२-२०, २१-६ असे पराभूत केले. भूषण याने शुभम याला पहिल्या गेममध्ये चांगलेच जेरीस आणले. मात्र दुसºया गेममध्ये जळगावच्या खेळाडूने राहुरीच्या खेळाडूवर वर्चस्व गाजवले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने आर.जी.तंत्रज्ञान विद्यापीठ, भोपाळला २-१ ने पराभूत केले. भूपाल नोबेल्स विद्यापीठाला एकतर्फी विजय प्राप्त केला. त्यांनी सोलापूर विद्यापीठाला २-० ने पराभूत केले. मुंबई विद्यापीठाने एम.आय.टी. विद्यापीठाला २-० ने नमविले, तर सरदार पटेल विद्यापीठ, वल्लभ विद्यानगर आणि कादीसर्व विद्यापीठ, गांधीनगर यांच्यातील लढत तुल्यबळ झाली. गांधीनगरला २-१ ने पराभूत व्हावे लागले.गुरुवार सायंकाळपर्यंत पुरुष सामन्यांच्या झालेल्या स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे - बरकतुल्लाह विद्यापीठ, भोपाळ विजयी विरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ३-१, देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर वि.वि मोहनलाल सुखदिया विद्यापीठ, उदयपूर, ३-० ने महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा वि.वि. वीर नर्मदा साऊथ गुजरात विद्यापीठ, सुरत ३-२, मुंबई विद्यापीठ मुंबई वि.वि. एल.एन. शारीरिक शिक्षणशास्त्र विद्यापीठ, ग्वाल्हेर ३-१, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर वि.वि. राणी दुर्गावती विद्यापीठ, जबलपूर यांच्यात झालेल्या सामन्यात सोलापूर संघाने ३-१ ने विजय मिळवला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे वि.वि. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.
अमरावती ३-०.महिलांच्या सामन्यात एल.एन. शारीरिक शिक्षणशास्त्र विद्यापीठ, ग्वाल्हेर वि.वि. जागरण लेक सिटी विद्यापीठ, भोपाळ २-०.वीर नर्मदा साऊथ गुजरात विद्यापीठ वि.वि. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती २-०,राणी दुर्गावती विद्यापीठ, जबलपूर विद्यापीठ वि.वि. महाराजा गंगासिंग विद्यापीठ बिकानेर २-०.बुधवारच्या सामन्यात पुरुषांमध्ये पुणे विद्यापीठाचा खेळाडू ऋषभ देशपांडे तर महिलांमध्ये भूपाल नोबेल्स विद्यापीठ, उदयपूरची मेघा रावत हे त्या दिवसाचे उत्कृष्ट खेळाडू ठरले. या स्पर्धांसाठी प्रमुख पंच म्हणून प्रा.संजय सोनवणे, तर पंच म्हणून शेखर सोनवणे, नरेश गुंडेले, राहुल साळी, शुभम पुरी, मनीष पांडे, पूजा पाटील, जाई कापरेकर, भक्ती मुदाळे, वष्णवी मंगळूरकर, मयूर भावसार, परीक्षित पाटील, जागृती भामरे, अजिंक्य पाटील, पराग बागुल यांनी काम पाहिले.
उमवि महिला संघ पराभूत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ महिला संघाला आज पराभवाचा सामना करावा लागला. आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकने २-० ने उमविचा पराभव केला. यात राधिनी भामरे हिला गायत्री मेहता हिच्याकडून २१-८, २१-१० असा पराभव पत्करावा लागला. तर स्वस्तिका बुटे हिने वृषाली ठाकरेला २१-७, २१-४ असे पराभूत केले.