आॅनलाईन लोकमतजळगाव दि, १५ : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ड्युटीला जात असलले हिंमतराव सुभाष पाटील (वय ४१, रा.दादावाडी, जळगाव मुळ रा.पातोंडा, ता.चाळीसगाव) यांना महामार्गावर जैन इरिगेशन कंपनीसमोर समोरुन येणा-या भरधाव डंपरने उडविल्याची घडना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता घडली. या अपघातात दुचाकी चक्काचूर झाली असून पाटील गंभीर जखमी झाले आहेत. नशिब बलवत्तर म्हणून त्यांचा या अपघातातून जीव वाचला. या अपघातानंतर डंपर चालकाने तेथून पळ काढला. दरम्यान, महामार्ग व राज्यमार्गावर आठवडाभरापासून दररोज अपघात होत आहेत.
हिंमतराव सुभाष पाटील हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू पी.पी.पाटील यांचे अंगरक्षक आहेत. बुधवारी सकाळी अकरा वाजता हिंमतराव पाटील हे दुचाकीने (क्र.एम.एच.१२ जी.डब्ल्यू.२४१०) विद्यापीठात डुटीला जाण्यासाठी निघाले होते. ११.३० वाजेच्या सुमारा पाटील हे जैन इरिगेशन कंपनीसमोरून जात असतांना पाळधीकडून जळगावकडे भरधाव वेगाने आलेल्या डंपरने (क्र. एम.एच.१९ झेड २३७९) ने त्यांच्या दुचाकीला भरधाव जोरदार धडक दिली. अपघातात पाटील हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले त्यात त्यांच्या हाता-पायाला व कमरेला मार बसला. डोक्याला दुखापत झाली आहे. दुचाकीचाही चुराडा झाला असून डंपरच्या दर्शनी भागाचेही नुकसान झालेले आहे. जैन कंपनीच्या कर्मचा-यांनी घेतली धावसमोरा-समोर झालेल्या धडकेचा आवाज होताच जैन इरिगेशन कंपनीच्या कर्मचाºयांनी तसेच परिसरातील नागरिकानी महामार्गाकडे धाव घेतली. यावेळी हिंमतराव पाटील हे रस्त्याच्याकडेला रक्तबंबाळ अवस्थेत होते. त्यांच्या खिशातील ओळखपत्र व पॅनकार्डवरून त्यांची ओळख पटली. पाटील हे विद्यापीठातील कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कंपनीच्या कर्मचाºयांनी पोलिसांना तसेच विद्यापीठला माहिती दिली. विद्यापीठाच्या रुग्णवाहिकेतूनच त्यांना जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.