जळगाव - जिल्ह्यात एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ कारभाराला नागरिक त्रासले आहेत. यंदा भारनियमन होणार नसल्याची घोषणा महावितरणने केली होती. मात्र, ही घोषणा केवळ जुमलाच असल्याचे जाणवत आहे. कारण ग्रामीण भागात महावितरण अघोषित भारनियमन पुकारले असून, दररोज तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करा
जळगाव - शहरातील शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्याबाबत रोटरी क्लबने महापालिकेकडे प्रस्ताव दिला होता. याबाबत महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव सादर करून स्मशानभूमी सुशोभीकरणबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी शिवाजीनगर भागातील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केली आहे. याबाबत दारकुंडे यांनी महापौर जयश्री महाजन यांना निवेदन दिले आहे.