पिलखोड,ता. चाळीसगाव : २१ रोजी दुपारी धोंडू सुपडू पाटील यांच्या घरात त्यांचे पुतणे निखिल बंडू पाटील व गौरव उर्फ बाळा बंडू पाटील यांनी काका धोंडू पाटील (६२) यांच्या पोटावर चाकूने सपासप वार करुन त्यांना जबर जखमी केले व त्यांचा मुलगा महेश धोंडू पाटील यांच्यावर सुद्धा चाकूचे वार करून त्यासही जबर जखमी केले. दोघांना चाळीसगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असता धोंडू पाटील यांना मृत घोषित केले.याप्रकरणी पुतणे निखील व गौरव यांना ताब्यात घेतले आहे.
पुतण्याकडून काकावर चाकूचे वार, काका ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:45 PM