आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि.१५ : कामगारांचे पगार, इतर देणी थकीत असतांना कारखान्यात पडून असणाºया १७४० साखरेच्या पोत्यांची विक्री कशी काय करता? असा जाब विचारत बेलगंगा साखर कारखान्यातील २५ हून अधिक कामगारांनी गुरुवारी कारखान्यावर आलेल्या जिल्हा बँकेच्या कर्मचा-यांना गेटवरच रोखले. यामुळे दुपारी ११ वाजता काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, बँकेने कर्मचाºयांसह साखरेची पोती भरुन आणण्यासाठी पाठविलेला ट्रक रिकाम्या हातीच माघारी परतला. न्यायालयीन बाब असल्याने पोलिसांनी देखील संरक्षण नाकारले.बेलगंगा साखर कारखान्याची लिलावाची प्रक्रिया झाली असून अंबाजी ट्रेडींग कंपनीने हा कारखाना ३९ कोटी २० लाख रुपयांना विकत घेतला आहे. कंपनीने रक्कम अदा केल्याने जिल्हा बँकेला कारखाना हस्तांतर करण्याची प्रक्रिया पुर्ण करावयाची असल्याने पडून असणा-या १७४० साखरेच्या पोत्यांच्या विक्रीचे टेंडर काढण्यात आले. नंदुरबार येथील एका व्यापा-याने टेंडर सोपास्कर पुर्णही केले.कामगारांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सर्वोच्च व औरंगाबाद खंडपिठात त्यांच्या पीएफसह पगार व इतर देणी बाबत खटले प्रलंबित आहेत. अंबाजी ट्रेडींग कंपनीने पीएफचे अकरा कोटी रुपये भरले असले तरी ते ३९ कोटी २० लाख या रकमेतून अदा केले आहे. सर्व व्यवहार पुर्ण झालेला नाही. कामगारांच्या खटल्यांमध्ये येत्या ४ ते ५ जानेवारी दरम्यान सुनावणी होणार असल्याने जिल्हा बँकेने साखर विक्रीचा घाट का घातला? असा आक्रमक प्रश्न उपस्थित करुन साखर विक्रीचा डाव उधळून लावला आहे.जिल्हा बँकेने चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना १३ ते १६ या दरम्यान कारखान्यावर पोलिस संरक्षण मागणीचे पत्र दिले होते. यावरही कामगारांनी आक्षेप घेत ग्रामीण पोलिसांसमोर आपली बाजू मांडतांना पोलिस संरक्षण देऊ नये, असे लेखी पत्र दिले. पोलिसांनी देखील न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत संरक्षण देण्यापासून हात झटकले आहे.
बेलगंगा साखर कारखान्यातील साखर विक्रीचा जिल्हा बँकेचा डाव उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 7:05 PM
कामगारांच्या विरोधामुळे जिल्हा बँकेने पाठविलेला ट्रक रिकामा परतला
ठळक मुद्देन्यायालयीन बाब असल्याने पोलिसांनी देखील संरक्षण नाकारलेपोती भरुन आणण्यासाठी पाठविलेला ट्रक रिकाम्या हातीच माघारीकारखान्यावर आलेल्या जिल्हा बँकेच्या कर्मचा-यांना गेटवरच रोखले