जळगाव : सध्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जिल्ह्याचे नेते आहेत. मी नेता नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यास मी तयार आहे. मात्र हे करीत असताना वाईट प्रवृत्तींना साथ देणार नाही, असा इशारा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला.मनपा निवडणुकीबाबत शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी निवासस्थानी पत्रकारांसोबत वार्तालाप केला.राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाहीमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत खडसे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेससोबत कदापीही जाणार नाही. पक्षाच्या भूमिकेशी सहमत नसेल तर वरिष्ठांसोबत चर्चा करण्यात येईल.महापालिका निवडणुकीत भाजपा व खाविआ यांच्या युतीबाबत अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही. जळगावात कोणतेही पाठबळ नसताना यापूर्वी आपण ३३ नगरसेवक निवडून आणले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष विजयी केला आहे. त्यावेळी फक्त एकट्या नाथाभाऊने जळगावात पक्ष वाढविला. निवडणुका सुरु होऊ द्या. माझ्या हातात भरपूर काही आहे. ‘आगे आगे देखो होता है क्या...’ असेही खडसे म्हणाले.भाजपा दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेत आहे. आमच्याकडे दोन मंत्री आहेत. पक्षाची ताकद आहे. मात्र तरी देखील भाजपा खाविआसोबत युती करण्यासाठी तयार होत आहे. वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्यानंतर जळगावातून अनेकांनी फोन करून याबाबत आपल्याला विचारणा केल्याचे त्यांनी सांगितले.
जळगावात गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार : माजी मंत्री एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 9:33 PM
सध्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जिल्ह्याचे नेते आहेत. मी नेता नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यास मी तयार आहे. मात्र हे करीत असताना वाईट प्रवृत्तींना साथ देणार नाही, असा इशारा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला.
ठळक मुद्देराष्ट्रवादीसोबत जाणार नसल्याचे स्पष्टीकरणवाईट प्रवृत्तींना कधीही साथ देणार नाहीभाजपाची ताकद असतानाही युतीसाठी आग्रह का?