ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.12 - महाजनकोच्या दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रातील वीज निर्मिती पूर्ववत सुरू झाल्याची माहिती मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर यांनी ‘लोकमत’ ला दिली.
दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील 500 मेगाव्ॉट क्षमतेचे दोन्ही संच वीज निर्मितीसाठी कार्यान्वित करण्यात आले आहेत.
पहिला संच रात्री सुरू
दरम्यान, दीपनगरातील 500 मेगाव्ॉट क्षमतेचा संच क्रमांक चार हा 11 जुलै रोजी रात्री 11.44 वाजता कार्यान्वित करण्यात आला आहे. दुसरा 500 मेगाव्ॉट क्षमतेचा संच क्रमांक पाच हा आज 12 जुलै रोजी 11.35 वाजता कार्यान्वित करण्यात आला आहे. या दोन्ही संचातून वीज निर्मितीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मुख्य अभियंता आर. आर. बावस्कर यांनी दिली.
संच क्रमांक चारमधून 387 व संच क्रमांक पाच मधून 113 मेगाव्ॉट अशी एकूण 500 मेगाव्ॉट वीज निर्मिती केली जात आहे.
दरम्यान, दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील संच क्रमांक तीन लोड मॅनेजमेंट सेल व्यवस्थापनाने तीन महिन्यांपूर्वीच बंद करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार हा संच बंद करण्यात आला आहे.
1 हजार 420 मेगाव्ॉट क्षमतेच्या दीपनगर वीज केंद्रातील वीज निर्मिती पूर्ववत सुरू झाली आहे.
दीपनगर वीज केंद्रातील दर
आजपासून महिनाभर म्हणजे 12 ऑगस्ट र्पयत दीपनगरातील 500 मेगाव्ॉटच्या दोन्ही संचाचे वीज दर 2.84 पैसे इतके राहतील. मागील महिन्यात या दोन्ही संचाचे वीज दर 2.89 पैसे इतके होते.
राज्याची मागणी
बुधवारी राज्याची वीजेची मागणी 11 हजार 583 मेगाव्ॉट इतकी आहे. महाजनकोची वीज निर्मिती 4 हजार 764 इतकी आहे.
कामगारांमध्ये आनंद
दीपनगरातील दोन्ही संचातून वीज निर्मिती पूर्ववत सुरू झाली आहे.त्यामुळे खाजगी कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, दीपनगरातील विविध कामगार संघटनांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे.
बंद संच असे
राज्यातील वीज निर्मिती केंद्रातील बंद संच असे आहेत. भुसावळ-दीपनगर-2, नाशिक-1, कोराडी-3,पारस-1, परळी-5, चंद्रपूर 1 असे एकूण 13 संच अजूनही बंद आहेत. महाजनकोचे महाराष्ट्रात सात वीज निर्मिती केंद्र आहेत. त्यात भुसावळ, नाशिक, पारस, परळी, खापरखेडा, कोराडी, चंद्रपूर असे केंद्र आहेत. त्यात एकूण 32 वीज निर्मिती संच आहेत.
एमओडी (मेरीट ऑर्डर डिसपॅच)
दीपनगरातील 500 मेगाव्ॉट क्षमतेचे दोन्ही संच एमओडीमध्ये गणले जातात . महाराष्ट्रातील विद्युत निर्मिती खर्चाच्या क्रमाने वीज निर्मिती संच आहेत. त्यानुसार दर निनिश्चित केल जातात. आता दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील दर दोन्ही संचांसाठी 2 रुपये 84 पैसे निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. वीजेचे दर महिन्याला बदलतात. संच बंदच्या काळात देखभाल व दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आता या केंद्रातील दोन्ही संच कार्यान्वित करण्यात आले आहेत. पूर्ववत वीज निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मुंबई मुख्यालयातील लोड मॅनेजमेंट सेल प्रशासनाने दीपनगरातील वीज निर्मिती संच कार्यान्वित करण्याची सूचना दिली. त्यानुसार दोन्ही संच कार्यान्वित करण्यात आले आहेत. वीज निर्मिती सुरू झाली आहे. या दोन्ही संचातून निर्माण होणा:या वीजेचा दर 2 रुपये 84 पैसे युनिट असा ठेवण्यात आला आहे. वीजेचे दर प्रत्येक महिन्याला कमी-जास्त होतात
- आर.आर.बावस्कर,
अभियंता, दीपनगर वीज निर्मिती केंद्र.