ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 27 - गणेश कॉलनी भागातील रहदारीला अडथळा ठरणारे विद्युत खांब हलविणे, भूमिगत केबल टाकणे यासह विद्युत पुरवठय़ाच्या यंत्रणेत फेरबदल करण्याचे सुतोवाच जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी दिले. कोर्ट चौकातील गटारीचेही रुंदीकरण करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य अधिका:यांना दिल्या. बुधवारी डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केलेल्या आवाहनानुसार गणेश कॉलनी, ख्वॉजामिया झोपडपट्टी भागातील मोकळ्या जागेतील भाजी बाजार व परिसराला किशोर राजे निंबाळकर यांनी भेट दिली. यावेळी डॉ. राधेश्याम चौधरी यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यात प्रामुख्याने शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधणे, गणेश कॉलनी परिसरातील अतिक्रमणे, विजेच्या खांबांचा अडथळा, शहरातील हॉकर्सला वा:यावर न सोडता त्यांना न्याय द्यावा अशा विविध मागण्यांवर प्रकाशझोत टाकला होता.गणेश कॉलनी भागात रहदारीस अडथळा ठरणा:या विद्युत खांबांच्या जागी भूमिगत केबल टाकणे, वीज पुरवठय़ाच्या यंत्रणेचे नियोजन करण्याचे आश्वासन त्यांनी देऊन अधिका:यांना त्या दृष्टीने सूचना केल्या. ख्वॉजामिया झोपडपट्टीच्या जागेवर बसलेल्या हॉकर्सची भेट घेऊन त्यांच्याशीही जिल्हाधिका:यांनी संवाद साधला.