शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वॉटरग्रेसवरून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही वस्त्रहरण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 4:10 AM

सुशील देवकर मनपाने शहरातील सफाईचा ठेका दिलेल्या नाशिक येथील वॉटरग्रेस या कंपनीशी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय ...

सुशील देवकर

मनपाने शहरातील सफाईचा ठेका दिलेल्या नाशिक येथील वॉटरग्रेस या कंपनीशी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय सुनील झंवर यांचा संबंध असल्याचे व त्याचा कारभार झंवर यांच्या रमेश मोटार ड्रायव्हींग येथील कार्यालयातूनच सुरू असल्याचे बीएचआर प्रकरणातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात सापडलेल्या कागदपत्रांवरून उघड झाले. त्यामुळे सत्ताधारी भाजपाचे तर वस्त्रहरण झालेच, मात्र झंवर यांच्याशी शिवसेनेच्या नगरसेवकांचेही असलेले घनिष्ठ संबंध जगजाहीर असल्याने विरोधीपक्ष सेनेचेही वस्त्रहरण झाले आहे. मनपातील सभांमध्ये किंवा बाहेरही एकमेकांवर केवळ आरोप करून विरोधाचे नाटक करायचे मात्र हितसंबंध जपताना एकत्र यायचे, अशीच वृत्ती सरसकट असल्याचे यातून दिसून आले आहे.

झंवर हे गिरीश महाजनांचे निकटवर्तीय असल्याचे जगजाहीर असतानाच बीएचआर प्रकरणात जप्त मालमत्ता अवसायकाशी संगनमताने अल्प दरात घेतल्याचा व त्यासाठी ठेवीदारांकडून बेकायदेशिरपणे ठेवींच्या पावत्या जेमतेम ३० टक्केच मोबदला देऊन घेतल्याचे आरोप झंवर यांच्यावर झाल्याने महाजन यांची अडचण झाली आहे. त्यातच भाजपाची सत्ता असलेल्या जळगाव मनपात सफाईचा ठेका असलेल्या वॉटरग्रेसमध्येही झंवर यांचीच भागिदारी असल्याचेही उघड झाल्याने यापूर्वी सफाई ठेक्यावरून नगरसेवकांवर होत असलेल्या पाकिट घेण्याच्या आरोपांना पुष्टीच मिळाली आहे.

मनपात वॉटरग्रेसचा ठेका देताना संबंधीत ठेकेदाराने मोडसऑपरेंडीप्रमाणे स्थानिक सत्ताधारी गटातील काही नगरसेवकही भागीदार करून घेतले. जेणे करून कामाबाबत ओरड होणार नाही. किंवा ओरड करणाऱ्यांना शांत करता येईल. मात्र तरीही ते शक्य न झाल्याने अखेर हा ठेका बंद करण्यात आला. तेव्हा विरोधी पक्ष असलेल्या सेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. तोपर्यंत या ठेक्यात झंवर यांची भागिदारी नव्हती, असे समजते. मात्र हा ठेका बंद केल्यावर भाजपाच्याच एका पदाधिकाऱ्याने शहरातील सफाईचा ठेका घेतला. तो काही दिवस चालला. मात्र मनपाच्या राजकारणातील कुरघोड्या सुरूच असल्याने प्रशासनाला हाताशी धरत वॉटरग्रेसलाच पुन्हा काम सुरू करू द्यावे लागेल, असे सांगत वॉटरग्रेसची पुन्हा एन्ट्री झाली. यावेळी मात्र सुनील झंवर हे या ठेक्यात भागीदार झाले होते, असे समजते. त्यांच्यावरच सर्व नगरसेवकांना सांभाळण्याचीही जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने केलेल्या पाकिटांच्या आरोपांना बळ मिळाले. विशेष म्हणजे झंवर यांच्या एन्ट्रीनंतर सफाईबाबत सभांमध्ये होणाऱ्या तक्रारी जवळपास बंदच झाल्या. विरोधकही शांत झालेले दिसले. मात्र जनतेला आत काय चालले आहे? हे समजत नसल्याने आरोप, प्रत्यारोप करून दिशाभूल करणे सुरूच होते. मात्र बीएचआर प्रकरणी झंवर यांच्याकडे पडलेल्या छाप्यानंतर ते प्रकाशझोतात आल्याने सत्ताधाऱ्यांसह विराेधकांचेही वस्त्रहरण झाले. त्यामुळेच पुन्हा रविवारी पत्रकार परिषद घेत भाजपाने तर पत्रक काढत सेनेने स्वत:वरील आरोप फेटाळत एकमेकांवर आरोपांची तोफ डागली आहे.