चोपडा, जि.जळगाव : म. गांधी शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत संस्थेंतर्गत विविध विभागांनी एकत्र येत एकाच व्यासपीठावर कला महोत्सव या कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम एकाच व्यासपीठावर सादर केले. त्यात सादर झालेला सांस्कृतिक कार्यक्रम हे शहरातील आकर्षण ठरले.यात बालवाडीपासून तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील सुप्त कलागुणांना आणि कलाविष्कार याला संधी मिळाली. म.गांधी शिक्षण मंडळामार्फत चालवले जाणारे बालवाडी विभाग, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, कला, शास्त्र, वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय, पॉलिटेक्निक कॉलेज, डी.फार्मसी कॉलेज, आॅक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, नर्सिंग कॉलेज हे सर्व विभाग मिळून कार्यक्रम झाला.सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची भूमिका वठवून नाटिका सादर करणे, रिमिक्स गाण्यांवर डान्स करणे, नाट्यछटा, एकपात्री नाटक, मिमिक्री आवाज, गीत गायन यासारखे कार्यक्रम सादर केले.या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार अनिल गावित, नायब तहसीलदार जितेंद्र पंजे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक लोकरे, चोपडा ग्रामीणचे प्रभारी संदीप आराक, संस्थेचे संचालक, संस्थाध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, सचिव डॉ.स्मिता पाटील, उपाध्यक्ष आशा पाटील, माजी प्राचार्य डॉ.पी. बी.पवार, संचालक प्रा.डी. बी.देशमुख, सुरेश सीताराम पाटील, सहसचिव तथा प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांनी केले.सूत्रसंचालन कलाशिक्षक दिनेश बाविस्कर, प्रा.पटवे, संदीप भास्कर पाटील, प्रा.डॉ.शैलेश वाघ आदींनी केले. या वर्षी प्रथमच एकाच व्यासपीठावर सर्व कार्यक्रम झाल्याचा प्रयोग यशस्वी झाल्याने याच पद्धतीने कार्यक्रम राबविण्यात यावेत, असे विविध विभागातील प्राध्यापक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी बोलून दाखवले.कला महोत्सव यशस्वीतेसाठी सर्व विभागातील प्रमुख त्यात उपप्राचार्य बी.एस. हडपे, पर्यवेक्षक व्ही.वाय. पाटील, मुख्याध्यापक नीळकंठ सोनवणे, मुख्याध्यापक भूपेश सोनवणे, प्राचार्या रेखा पाटील, अशोक साळुंखे, प्रा.आर.आर. पाटील, भूषण पवार, प्रा.पी.एल.लोहार आदींनी परिश्रम घेतले.
चोपडा येथे म.गांधी शिक्षण मंडळातर्फे एकत्रित कलाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 4:01 PM
म. गांधी शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत संस्थेंतर्गत विविध विभागांनी एकत्र येत एकाच व्यासपीठावर कला महोत्सव या कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम एकाच व्यासपीठावर सादर केले.
ठळक मुद्देसांस्कृतिक कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसह वठवल्या विविध भूमिकामान्यवरांनी केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुकया वर्षी प्रथमच एकाच व्यासपीठावर सर्व कार्यक्रम झाल्याचा प्रयोग यशस्वी