या दिनानिमित्त भडगावात ‘हिरवांकुर’ फाउंडेशन नाशिक या पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या संकल्पनेतून साकारलेल्या बालक-पालक या उपक्रमांतर्गत वृक्षप्रेमींना बीजारोपणासाठी ट्रे, विविध भारतीय प्रजातीच्या वृक्षांच्या बिया आणि त्या रुजविण्यासाठी कोकोपीट अशा निःशुल्क साहित्याचा समावेश असलेल्या किटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी योगेश शिंपी यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. अविनाश भंगाळे यांनी बीजारोपणाविषयी उपयुक्त माहिती सांगून मार्गदर्शन केले. सुशील महाजन यांनी आभार मानले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी नाशिक येथील शहाजी, नितीन जगदाळे, चेतन बागमार, शाह यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले, तर संगीता भंगाळे, दीपमाला शिंपी, करिमा खान, हेमंत खैरनार, गणेश पाटील, अनिल दुसाने, प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी शंकर मोरे, रुपाली पाटील, शाम पाटील, लोटनराव पाटील उपस्थित होते.
ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी योगेश शिंपी, प्रा. अविनाश भंगाळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
290721\29jal_1_29072021_12.jpg
भडगाव येथील उपक्रमात सहभागी नागरिक, महिला.