चाळीसगाव : कोरोना आजाराशी झुंज देतांना मृत पावलेले चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक गोपाळ भोई यांना स्वातंत्र्यदिनी शनिवारी अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ पोलिस स्टेशन व दृष्टी फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ७५ रक्त पिशव्यांचे संकलन झाले असून स्वतः आमदार मंगेश चव्हाण यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. पोलिस नाईक गोपाळ विठ्ठल भोई यांचा नुकताच कोरोनाने मृत्यू झाला. तरुण पोलिस बांधवाचा मृत्यू झाल्याने शहर परिसरात हळहळ व्यक्त झाली. गोपाळ भोई यांचा मनमिळावू स्वभाव आणि त्यांचा झालेला दूर्वेवी मृत्यू याच्या तीव्र संवेदना समाज माध्यमावर व्यक्त झाल्या.त्यांच्या स्मरणार्थ कोरोना काळात गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे. त्यांची फरफट होऊ नये. यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. याला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे महिलांनी देखील रक्तदान केले. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते उद्धवराव महाजन, खादी ग्रामोद्योग संस्थेचे चेअरमन किसनराव जोर्वेकर, तालुका वृत्तपत्रकार मंडळाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, पालिकेचे गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक अरुण अहिरे, एम.बी.पाटील, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे, सुनील निकम, बबन पवार, अरुण पाटील, दृष्टी फाऊंडेशनचे वामन पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. गरजू रुग्णांनी रक्तासाठी पोलिस स्टेशनशी संर्पक करावा असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी लाईफ सेव्हर गृपचेही सहकार्य लाभले.
चाळीसगाव येथे कोरोनाना मृत पावलेल्या पोलिकचे पोलिसांना अनोखी श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 9:25 PM