शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

साहित्यिकाचे अनोखे मृत्युपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:37 PM

संपत्ती व जबाबदाऱ्यांची वाटणी नाही, तर अंत्यसंस्काराबद्दल होत्या सूचना : त्यांच्या इच्छेनुसारच कुटुंबीयांनी दिला अखेरचा निरोेप

पारोळा: तालुक्यातील टेहू येथील जेष्ठ साहित्यिक हिंमत पुंजू मोरे यांचे १७ रोजी रात्री ११.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र मरण हे अंतिम सत्य आहे. ते कुणालाच टळलेले नाही याचे भान राखून त्यांनी आधीच आपले मृत्युपत्र करून ठेवले होते आणि त्यात आपल्यावर नेमके कशारितीने अंत्यसंस्कार व्हावेत हे नमूद करून ठेवलेले होते. त्यानुसार अधिक शोक न करता व कोणतेही विधी न करता त्यांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.साधारणत: मृत्युपत्रात संपत्तीची वाटणी आणि आपल्या पश्चात परिवाराच्या जबाबदाऱ्यांची विभागणी केलेली असते परंतु मोरे यांचे मृत्यूपत्रसुद्धा काहीसे वेगळेच होते.१९ आॅगस्ट २०१२ रोजीच्या या मृत्युपत्रात त्यांनी संपत्तीची वाटणी केलेली नाही. तर मृत्युनंतर आपले अंत्यसंस्कार कसा करावे हे लिहून ठेवले आहे. त्यात बाहेरगावच्या नातेवाइकांना धावपळ करीत अंत्ययात्रेला बोलावू नये. मी १०० टक्के नास्तिक आहे. माझ्या मृत्युनंतर पोथी वगैरे वाचू नये व दानपुण्य करू नये. कोणीही शोक करू नये, जास्त रडू नये. उसंतीने पत्रे पाठवून मृत्यूची वार्ता कळवावी किंवा वर्तमानपत्रातून निधन वार्ता कळवावी.मी नेहेमी जे कपडे वापरतो तेच मृतदेहासाठी घ्यावे. नवे आणले तरी चालतील. देहाची पूजा व आरत्या करू नये. देह तिरडीवरून ठेवून वा बैलगाडीने किंवा वाहनातून माझ्या शेतात अग्निस्वाधीन करावा. निंबाच्या झाडाखाली सोयीस्कर जागा आहे. देह नेताना बाकोडी (मुरमुरे, कवडी, पैसे) फेकू नये. जीव दगड काढू नये. तिसºया दिवशी राख जमा करावी व शेतात फेकावी, उर्वरित अस्थी शेतात जमिनीत टाकावीत.कोणतीही पूजा करू नये. नैवेद्य दाखवू नये.पाऊस असल्यास देह गावातील स्मशानभूमीत दहन करावा. सुतक पाळू नये. १० वे , ११ वे , १३ वे , गंधमुक्ती असे विधी करू नये. माझे पितर घालू नये. वर्षीश्राद्ध डेरे भरू नये. त्या त्या दिवशी फक्त सूर्याला अगरबत्ती ओवाळावी. घरात माझा फोटो टांगू नये, असे या मृत्युपत्रात त्यांनी लिहून ठेवले होते.मुलगा जितेंद्र याने वडिलांची इच्छा पूर्ण व्हावी. यासाठी त्यांचे अंत्यसंस्कार मृत्युपत्राप्रमाणे केले. व त्यांचे मृत्युपत्र अंत्यसंस्कारवेळी उपस्थित लोकांना वाटप केले.त्यांच्या निधनाने एक जेष्ठ साहित्यिक हरपल्याच्या भावना माजी खासदार अ‍ॅड. वसंतराव मोरे, माजी पालकमंत्री डॉ सतीश पाटील यांनी व्यक्त केल्या.