ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 27- बंद असलेल्या विद्यापीठस्तरीय निवडणुका मागणी करूनही घेतल्या जात नसल्याने या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी अन्यथा रस्त्यावर उतरून 8 व 9 जानेवारी 2018 रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभाविपचे प्रदेशमंत्री अभिजित पाटील यांनी दिला. जळगाव येथे अभाविपच्या 52व्या राज्यस्तरीय अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी अभाविपची आगामी दिशा मांडताना अभिजित पाटील बोलत होते. या वेळी व्यासपीठावर परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रशांत साठे उपस्थित होते. आगामी कामांविषयी चर्चा करण्यात येऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
निवडणुकांबाबत प्रश्नचिन्हविद्यापीठस्तरीय होणा:या निवडणुका बंद असल्याने विद्याथ्र्याना समस्या मांडता येत नाही. प्रतिनिधी निवडीत अडथळे येतात. यासाठी या निवडणुका घेण्याविषयी मागणी केली जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अभाविपने आता आपल्या आगामी दिशेत या निवडणुकांना स्थान दिले असून या निवडणुका घेण्यात याव्यात ही मागणी कायम असल्याचे ते म्हणाले. निवडणुका का घेतल्या जात नाही, या विषयी प्रश्नचिन्ह असून खुल्या निवडणुका घेतल्या नाही तर 8 व 9 जानेवारी रोजी रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी प्रदेश मंत्री पाटील यांनी दिला.
वसतिगृहातील समस्या सोडविण्यासाठी सेल्फी अभियानराज्यात जवळपास सर्वच ठिकाणी वसतिगृहांमध्ये मोठय़ा समस्या आहेत. याबाबत विद्यार्थी आंदोलनही करतात, मात्र उपाययोजना होत नाही. त्यामुळे वसतिगृह संपर्क अभियानांतर्गत राज्यभरात वेगवेगळ्य़ा वसतिगृहात जाऊन 1 ते 7 फेब्रवारी असे सप्ताहभर समस्यांसोबत सेल्फी काढण्याचे अभियान राबविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले.
‘गावाकडे चला’ अनुभूती शिबिरविद्याथ्र्याना गावाची ओळख व्हावी यासाठी अभाविपतर्फे मार्च-एप्रिल महिन्यात गावाकडे चला हे अनुभूती शिबिर घेण्यात येणार असल्याचेही या वेळी जाहीर करण्यात आले.या सोबतच नक्षलवादाविरोधात लढा देण्यासाठी परिषदेच्यावतीने गावागावात आंदोलन करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले.
अभियांत्रिकी विद्याथ्र्याच्या प्रकल्पांना व्यासपीठअभियांत्रिकीच्या विद्याथ्र्यानाकडून तयार करण्यात येणा:या प्रकल्पांना व्यासपीठ मिळावे, म्हणून 10 ते 13 मार्च 2018 दरम्यान सांगली येथे ‘डिपेक्स’ घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. या सोबतच प्रतिभा संगम पुणे येथे घेण्यात येणार असून विद्याथ्र्याचे मनोगत जाणून घेण्यासाठी कोल्हापूर येथे अभियान राबविण्यात येईल, भोपाळ येथे कार्यशाळा, राष्ट्रीय कृषी छात्र संमेलन घेणे, परिषदेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे तसेच महाराष्ट्रात प्रत्येक विद्याथ्र्यार्पयत पोहचणे, असे ध्येय असल्याचे पाटील यांनी सांगितले. परिषदेत संमत झालेले प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असून समर्पित कार्यकर्ता कसा तयार होईल, यासाठी विचार करावा लागणार असल्याचेही पाटील म्हणाले.